खरंच दरवर्षी 18 कोटींचा घोटाळा? सिद्धिविनायक न्यासाच्या दानपेटीत…सदा सरवणकरांनी A टू Z सांगितलं!
न्यूज

खरंच दरवर्षी 18 कोटींचा घोटाळा? सिद्धिविनायक न्यासाच्या दानपेटीत…सदा सरवणकरांनी A टू Z सांगितलं!

Aug 1, 2026

Siddhivinayak Trust : राज ठाकरे यांनी सिद्धिविनायक मंदिराच्या बाबतीत गैरसमजाने काही माहिती दिली. सिद्धिविनायक न्यासाच्या आमच्या काही ट्रस्टींनी सरकारला एक पत्र दिले होते. या पत्रात देणगीची चौकशी करा, अशी विनंती केली होती. या पत्रामुळे नागरिकांमध्ये गैरसमजाची भावना निर्माण झाली. सिद्धिविनायक न्यास गेली दोन वर्षे उत्कृष्ट पद्धतीने काम करत आहे, असे सदा सरवणकर यांनी स्पष्ट केले आहे.एक पत्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे. या पत्रात मंदिरात दरवर्षी सुमारे 18 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा केला जातोय, असं नमूद असल्याचा आरोप मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केला आहे. याबाबत तुमचे मत काय आहे? असे सदा सरवणकर यांना विचारण्यात आले.

या प्रश्नाचे उत्तर देताना, संबंधित पत्रात चोरी असा कुठेही उल्लेख नाही. पूर्वी सिद्धिविनायक न्यासाची दानपेटी होती, त्यात दरवर्षी 40 ते 45 लाख रुपये होती. गेल्या महिन्याभरात हे दान 90 ते 98 लाख रुपयांपर्यंत दान वाढले आहे. मंदिरा परिसरात ज्या उपायोजना केल्या आहेत, त्यामुळे हे दान वाढले आहे, असे स्पष्टीकरण दिले.अगोदर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून gpay वरून दर्शनासाठी पैसे घेतले जात होते. हे सर्व लक्षात आल्यावर मी 19 कर्मचाऱ्यांना सस्पेंड केलं. त्यांच्याकडून नंतर शपथपत्र घेतलं. काही ठिकाणी कर्मचारी हातचलाखी करून पैसे काढतात. हे कळलं तेव्हा आम्ही कारवाई केली. 9 कर्मचाऱ्यांना पकडलं. भटजींना काही जण पैसे देतात पण आपल्याला असलेल्या GR प्रमाणे भटजींना जर कोणी पैसे दिले तर ते दानपेटीत टाकावं लागतं. असेही सदा सरवणकर यांनी पुढे सविस्तर सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *