Thane: शिष्यवृत्ती परीक्षेत ठामपा शाळेची ईश्वरी मंजारेची बाजी; जिल्ह्यातील सर्व मनपा शाळांतून प्रथम….300 पैकी 260 गुण मिळवत जिल्ह्यात पाचवा क्रमांक….ठाणे मनपा शिक्षण विभागाच्या गुणवत्तेवर पुन्हा शिक्कामोर्तब ; सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत ठामपाचे 11 विद्यार्थी झळकले!
ठाणे न्यूज शिक्षण

Thane: शिष्यवृत्ती परीक्षेत ठामपा शाळेची ईश्वरी मंजारेची बाजी; जिल्ह्यातील सर्व मनपा शाळांतून प्रथम….300 पैकी 260 गुण मिळवत जिल्ह्यात पाचवा क्रमांक….ठाणे मनपा शिक्षण विभागाच्या गुणवत्तेवर पुन्हा शिक्कामोर्तब ; सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत ठामपाचे 11 विद्यार्थी झळकले!

Aug 11, 2026

ठाणे ११: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 198, मराठी, मुंब्रा येथील विद्यार्थिनी कु. ईश्वरी उपा सुनील मंजारें हिने घवघवीत यश संपादन केले आहे. ईश्वरीने या शिष्यवृत्ती परीक्षेत 300 पैकी तब्बल 260 गुण मिळवत 86.66 टक्के गुण प्राप्त करीत ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका शाळांमधून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांमध्ये तिने पाचवा क्रमांक मिळवून ठाणे महानगरपालिकेच्या शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे.

तर शाळा क्र. 63 ची उर्दु माध्यमाची विद्यार्थीनी झोबिया मोहम्मद अयाज हिने 71.33 गुण प्राप्त करीत जिल्हयातून 109 वा क्रमांक प्राप्त केला आहे. ईश्वरी आणि झोबिया या विद्यार्थीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी तिचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ईश्वरीच्या या यशामुळे मुंब्रा येथील ठामपा शाळा क्रमांक 198 चे नाव उज्ज्वल झाले असून, तिच्या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. शिष्यवृत्ती परीक्षेतील ईश्वरीच्या वैयक्तिक यशासोबतच ठाणे महानगरपालिका शाळांनीही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. महानगरपालिका शाळांच्या कामगिरीत ठाणे मनपाने 86.66 टक्के गुणांसह अव्वल स्थान मिळविले आहे. त्यामुळे ठाणे मनपा शिक्षण विभागाच्या शैक्षणिक उपक्रमांना आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक परीक्षांची तयारी, नियमित सराव, शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण मूल्यमापन यामुळे मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढत आहे. ईश्वरीने मिळविलेले यश हे तिच्या मेहनतीसोबतच शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे प्रोत्साहन यांचेही फलित आहे. उपायुक्त डॉ. मिताली संचेती आणि शिक्षणाधिकारी शेषराव बढे यांनीही ईश्वरीचे अभिनंदन केले असून, तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. ईश्वरीच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

ईश्वरीच्या यशामुळे तिचे पालक, शिक्षक, शाळा प्रशासन तसेच संपूर्ण ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागात आनंदाचे वातावरण आहे. योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण प्रयत्नाने विद्यार्थीही मोठे यश संपादन करू शकतात, हे ईश्वरीच्या कामगिरीने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. विद्यार्थिनीची मेहनत, पालकांचे प्रोत्साहन, शिक्षकांचे समर्पण आणि ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागाचे सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या जोरावर मिळालेले हे यश ठाणे मनपासाठी निश्चितच अभिमानाचा क्षण ठरले आहे. सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत ठामपा शाळेचे 11 गुणवत्ता विद्यार्थी झळकले.

सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत ठामपा उर्दु शाळेचे 10 तर हिंदी माध्यमाच्या एका विद्यार्थीनाने गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. उर्दु माध्यम : अब्रीन बानो मोहम्मद शाहीद – शाळा क्र. 109 सालमणी आाशिया खातून अब्दुल अजीज – शाळा क्र. 108, खान अबु नुमन अब्दुल वफा – शाळा क्र. 100 खान अबान हकीक – शाळा क्र. 109, शहा अहमद अली अब्दुल अजीज – शाळा क्र. 109, खान अबु हुजायफा सरीम मुमताज अहमद – शाळा क्र. 125, कुरेशी अबु बकार मेहबूब आलम – शाळा क्र. 100, शेख अहाद मोहिद हुसेन – शाळा क्र. 108, सिध्दीकी अब्दुल्ला जुल्बा जादेन शफी उद्दीन – शाळा क्र. 125, अबुलाबाबा अबुजार – शाळा क्र. 109) , हिंदी माध्यम : मिस्त्री वर्षा सुरेंद्र कुमार – शाळा क्र. 54

ठाणे जिल्ह्यातील मनपा शाळांचा निकाल:

ठाणे महानगरपालिका – 86.66%

कल्याण महानगरपालिका – 84.66%

नवी मुंबई महानगरपालिका – 80.66%

भिवंडी महानगरपालिका – 80.00%

भाईंदर महानगरपालिका – 71.81%

उल्हासनगर महानगरपालिका – 61.11%

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *