Thane: हर घर तिरंगा अभियानांतर्गत ठामपा शाळांमध्ये ‘तिरंगा वंदे मातरम्’; प्रदर्शनास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
न्यूज

Thane: हर घर तिरंगा अभियानांतर्गत ठामपा शाळांमध्ये ‘तिरंगा वंदे मातरम्’; प्रदर्शनास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

Aug 13, 2026

ठाणे १३ : हर घर तिरंगा अभियानांतर्गत ‘तिरंगा वंदे मातरम्’ प्रदर्शनाचा विशेष कार्यक्रम ठाणे महानगरपालिकेच्या विविध शाळांमध्ये उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमास कळवा प्रभाग समितीचे अध्यक्षा विजया लासे, नगरसेवक मिलिंद पाटील, कळवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त ललिता जाधव, तसेच गट क्रमांक 3 चे गटप्रमुख संतोष दळवी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमास ठाणे महानगरपालिका शाळा क्र. 69, 70, 115 व माध्यमिक शाळा क्र. 2 येथील मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपायुक्त डॉ. मिताली संचेती, शिक्षणाधिकारी शेषराव बढे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व गटअधिकारी या अभियानास विशेष मेहनत घेत आहेत.

प्रदर्शनामध्ये भारतीय तिरंग्याची रचना व निर्मितीचा इतिहास, तिरंग्यातील रंगांचे महत्त्व, अशोकचक्राची माहिती, राष्ट्रध्वजाचा प्रवास तसेच ‘वंदे मातरम्’चे ऐतिहासिक महत्त्व व स्वातंत्र्यलढ्यातील योगदान यांची माहितीपूर्ण मांडणी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी विविध शैक्षणिक साहित्य, माहितीफलक व तिरंग्याच्या प्रतिकृतींच्या माध्यमातून प्रदर्शन साकारले.

उपस्थित मान्यवरांनी प्रदर्शनाची पाहणी करून विद्यार्थ्यांनी केलेल्या सर्जनशील व अभ्यासपूर्ण मांडणीचे कौतुक केले. राष्ट्रध्वजाबद्दल आदर, देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि स्वातंत्र्याच्या मूल्यांची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. सदरचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात, शिस्तबद्ध व देशभक्तीमय वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

ठामपा शाळा क्रमांक 38 शांतीनगर व ठामपा शाळा क्र. 79 दिवा येथेही वंदे मातरम् यांचे ऐतिहासिक महत्व हा उपक्रम कार्यक्रम व तिरंगा प्रदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *