Thane: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटाच्या माहिती फलकाचे अनावरण;आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते उद्घाटन; युवा पिढीला मिळणार अहिल्यादेवींच्या कार्याची माहिती!
ठाणे न्यूज

Thane: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटाच्या माहिती फलकाचे अनावरण;आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते उद्घाटन; युवा पिढीला मिळणार अहिल्यादेवींच्या कार्याची माहिती!

Aug 13, 2026

ठाणे : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त धनगर प्रतिष्ठान, ठाणे जिल्हा यांच्या वतीने ठाण्यातील मासुंदा तलाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटाच्या माहिती फलकाच्या अनावरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या माहिती फलकाचे उद्घाटन आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते करण्यात आले.

धनगर प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आलेल्या मागणीनुसार आमदार निरंजन डावखरे यांच्या आमदार निधीतून मासुंदा तलाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकालगत असलेल्या घाटाच्या फलकाचे सुशोभीकरण करण्यात आले. तसेच येथे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट’ असे नामफलक आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची माहिती देणारा माहिती फलक उभारण्यात आला आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून या माहिती फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी समाजाचे नेते शंकरभाई वीरकर, बाबासाहेब दगडे, संदेश कवितके, धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे, गोविंद पाटील, भाजपा भटक्या विमुक्त आघाडी ठाणे शहर जिल्हाध्यक्षा उज्वला गलांडे, भाजपा मुंबई प्रदेश सचिव निहारिका कोंदले, भाजपा वर्तकनगर मंडळ महिला अध्यक्षा वर्षा माने, धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या सचिव गायत्री गुंड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती व घोंगडी देऊन समाजाच्या वतीने आमदार निरंजन डावखरे यांचे आभार मानले.

यावेळी बोलताना आमदार निरंजन डावखरे म्हणाले, “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटालगत असलेल्या स्मारकातील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण १९८८ मध्ये झाले. त्यावेळी माझे वडील स्व. वसंतराव डावखरे महापौर होते आणि त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला होता. आज याच ठिकाणी घाटाचा माहिती फलक उभारण्याचे काम करण्याची संधी धनगर समाजाने मला दिली, त्यामुळे मला अभिमान वाटतो. यासाठी मी समाजाचे आभार मानतो.”

या माहिती फलकाच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची महती युवा पिढीसह सर्वसामान्य नागरिकांना समजणार असून, त्यांच्या प्रेरणादायी कार्याची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होणार असल्याचे डावखरे यांनी सांगितले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनगर प्रतिष्ठानचे सचिव तुषार धायगुडे, उपाध्यक्ष राजेश वीरकर, खजिनदार अनिल जरग, कार्यकारिणी सदस्य अविनाश लबडे, सुरेश भांड, उत्तम यमगर, सल्लागार मनोहर वीरकर, सूर्यकांत रायकर, सुनील राहिंज, सुनील पळसे, रमण गोरे, अवधूत लाळगे, महिला मंडळाच्या संगिता खटावकर, सुषमा बुधे, सुजाता भांड, अमृता बुधे आदींनी विशेष मेहनत घेतली. यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *