Sanjay Raut : संजय राऊत यांची पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका,!
ताज्या बातम्या राजकारण

Sanjay Raut : संजय राऊत यांची पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका,!

Aug 15, 2026

​संजय राऊत ,: स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून दिलेल्या भाषणावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडक शब्दांत निशाणा साधला आहे. “देश नेहमीच युवा शक्तीच्या जोरावर पुढे गेला आहे, त्यामुळे ७५ वर्षे पूर्ण झालेल्या नेत्यांनी आता सत्ता सोडून ती तरुणांच्या हाती सोपवावी,” असा टोला त्यांनी लगावला.

​पंतप्रधानांनी भाषणात विरोधकांवर केलेल्या आरोपांचा समचार घेताना राऊत म्हणाले की, “पंतप्रधान सतत खोटं बोलत आहेत; पण किमान स्वातंत्र्यदिनासारख्या पवित्र दिवशी तरी त्यांनी खोटं बोलायला नको होतं.” या देशासाठी हजारो-लाखो तरुणांनी प्राणांचे बलिदान दिले आहे. अशा वेळी त्या हुतात्म्यांचे स्मरण करण्याऐवजी पंतप्रधान विरोधकांवर आरोप करत असतील, तर हे देशाचे दुर्दैव आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तरुणांच्या त्यागामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले असून पंतप्रधानांच्या अशा वक्तव्यांवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *