मुंबई १५ : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र दादा चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि भारतमाता पूजन उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमास भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा विधानपरिषद आमदार ॲड. निरंजन डावखरे यांची प्रमुख उपस्थिती होती.डौलाने फडकणाऱ्या तिरंग्याला अभिवादन करताना स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या स्वातंत्र्यवीरांच्या त्याग आणि बलिदानाचे स्मरण करण्यात आले.
त्यांच्या त्यागामुळेच आज देश स्वातंत्र्याचा गौरवशाली उत्सव साजरा करू शकत आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत विकास, प्रगती आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. विकसित आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देत प्रत्येक कार्यकर्ता समर्पित भावनेने कार्यरत राहील, असा संकल्प यावेळी करण्यात आला.
यावेळी विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा आमदार चित्राताई वाघ, आमदार श्रीकांत भारतीय, प्रदेश सरचिटणीस सुनील राणे, प्रदेश कार्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नगरसेवक नवनाथ बन तसेच अन्य पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
