Kurla: मुंबईत मोठी दुर्घटना; कुर्ल्यात क्रेन आणि जेसीबी कोसळले, सुदैवाने जीवितहानी टळली!
ताज्या बातम्या

Kurla: मुंबईत मोठी दुर्घटना; कुर्ल्यात क्रेन आणि जेसीबी कोसळले, सुदैवाने जीवितहानी टळली!

Aug 21, 2026

कुर्ला २१: मुंबईतील कुर्ला येथील कुरेशी नगर परिसरात शुक्रवारी पहाटे २:४० वाजताच्या सुमारास एक दुर्घटना घडली. या भागात ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे काम सुरू होते. कामादरम्यान क्रेनद्वारे जेसीबी मशीन उचलून शिफ्ट करत असताना अचानक क्रेन आणि जेसीबी दोन्ही मशीन खाली कोसळल्या. ही क्रेन थेट एका घरावर आणि कुर्ला व ट्रॉम्बे दरम्यानच्या सिंगल लाईनवर असलेल्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक (OHE) लाईनवर जाऊन पडली.जेसीबी शिफ्ट करत असताना खबरदारी म्हणून तो परिसर आधीच रिकामा करण्यात आला होता, ज्यामुळे खूप मोठा अपघात टळला. या घटनेत ८ ते १० जण जखमी झाल्याची माहिती स्थानिकांकडून दिली जात आहे, तर रेल्वे प्रशासनाने २ जण जखमी झाल्याची पुष्टी केली आहे.

सुदैवाने या घटनेत कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही आणि कोणतीही जीवितहानी झालेली नाही.मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना ज्या लाईनवर घडली, तिचा वापर प्रामुख्याने मालगाड्यांच्या वाहतुकीसाठी केला जातो. त्यामुळे सामान्य लोकल किंवा प्रवासी रेल्वे सेवांवर याचा कोणताही परिणाम झालेला नाही आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली नाही. रेल्वेने या अपघाताला पूर्णपणे MMRDA जबाबदार असल्याचे म्हटले आहे.घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सध्या घटनास्थळावरून ढिगारा आणि मलबा हटवण्याचे काम वेगाने सुरू असून अपघाताच्या इतर बाजूंचाही शोध घेतला जात आहे!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *