उबाठाला धक्का; महेश कदम यांनी हाती घेतला भगवा.. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते टेंभी नाका येथील दहीहंडी उत्सवात कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश!
ताज्या बातम्या राजकारण

उबाठाला धक्का; महेश कदम यांनी हाती घेतला भगवा.. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते टेंभी नाका येथील दहीहंडी उत्सवात कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश!

Sep 8, 2026

ठाणे : ठाण्यातील राजकीय वर्तुळात उबाठा गटाला धक्का देणारी घडामोड घडली आहे. उबाठामध्ये कार्यरत असलेले आणि ठाणे महानगरपालिकेची निवडणूक लढवलेले महेश कदम यांनी आपल्या समर्थक आणि कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. टेंभी नाका येथे आयोजित दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश पार पडला.टेंभी नाका येथील दहीहंडी उत्सवासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असताना महेश कदम यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला.

शिंदे यांनी कदम यांचे पक्षात स्वागत केले. कदम यांच्या पक्षप्रवेशामुळे ठाण्यातील राजकीय समीकरणांमध्ये, विशेषतः स्थानिक पातळीवर, शिवसेनेला बळ मिळणार असल्याचे बोलले जात आहे.महेश कदम हे यापूर्वी उबाठा गटात सक्रिय होते. ठाणे महानगरपालिकेची निवडणूकही त्यांनी लढवली होती. त्यामुळे कदम यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे उबाठा गटासाठी हा धक्का मानला जात आहे.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कदम यांच्या शिवसेना प्रवेशाला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे.यावेळी खासदार नरेश म्हस्के, ठाणे शहरप्रमुख हेमंत पवार, महापौर शर्मिला पिंपळोलकर, ठाणे जिल्हा महिला संघटिका सौ. मीनाक्षी शिंदे, पक्षाचे प्रवक्ते राहुल लोंढे, निखिल बुडजडे, स्वानंद पवार, जॅकी भोईर यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *