ठाणे महापालिका निवडणुकीसाठी 15 कलमी जाहिरनाम्यातुन काँग्रेसची सर्वसामान्य ठाणेकरांना साद
ठाणे, 12 – ठाण्यातुन क्लस्टर हद्दपार करून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरांची निर्मिती करण्याचा संकल्प काँग्रेस (आय) ने केला आहे. ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुक – 2026 साठी ठाणे शहर काँग्रेसने आपला १५ कलमी जाहिरनामा शनिवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते प्रकाशित केला. या
निवडणूककामी कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांचा टपाली मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद 1945 टपाली मतपत्रिका प्राप्त
ठाणे 12 – निवडणूककामी कार्यरत असलेल्या व प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर काम करणाऱ्या सरकारी अधिकारी कर्मचारी तसेच पोलीस यांना त्यांचा मतदानाचा अधिकार बजावता यावा यांनी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या टपाली मतदानाला अधिकारी कर्मचारी यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून
माजी आमदार दगडू सकपाळ यांचा शेकडो समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश
महापालिका निवडणुकीपूर्वी लालबाग-परळमध्ये शिवसेनेचा उबाठाला झटका मुंबई, 12 – उबाठाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार दगडू सकपाळ यांनी आज शेकडो समर्थकांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. सकपाळ यांच्या प्रवेशाने महापालिका निवडणुकीपूर्वी लालबाग-परळमध्ये शिवसेनेने उबाठाला जोरदार झटका दिला. शिवसेना वाढवण्यासाठी तुरुंगवास भोगणारे,
ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत 32 प्रभागांमध्ये चार तर एका प्रभागात तीन उमेदवारांना मतदान केल्यावरच प्रक्रिया पूर्ण – आयुक्त सौरभ राव
ठाणे 12– ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 साठी ठाणे महापालिका क्षेत्रातील एकूण 33 प्रभागांमध्ये विभाजन करण्यात आले असून 131 नगरसेवकांच्या जागांसाठी निवडणूक होत आहे. प्रभाग क्रमांक 1 ते 28 व 30 ते 33 या 32 प्रभागात प्रत्येकी चार जागांसाठी मतदान होणार असून प्रभाग
ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीतील प्रभाग क्र. 23 मधील चार मतदान केंद्राच्या जागेत बदल
ठाणे 12 – ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025–26 च्या पार्श्वभूमीवर मतदारांची गैरसोय टाळण्यासाठी व मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी प्रभाग क्रमांक 23 मधील चार मतदान केंद्रांचे ठिकाण बदलण्याचा आदेश निवडणूक अधिकारी तथा आयुक्त सौरभ राव यांनी जारी केला आहे. हा निर्णय मा.
निवडणूक आदेश नाकारणाऱ्या ठाण्यातील रेन्बो इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापकांवर फौजदारी गुन्हा दाखल
ठाणे 12– दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान केंद्रांवरील कामकाजाकरिता निवडणूक विभागाकडून बजावण्यात आलेले आदेश नाकारल्याप्रकरणी ठाण्यातील रेन्बो इंटरनॅशनल या शाळेच्या मुख्याध्यापकांवर मा. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गुन्हा दाखल केला असल्याची माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ
“मुंबई भगवी, ठाणे भगवे… आता मीरा भाईंदरही भगवेच!”
मीरा भाईंदरमधील सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आक्रमक हल्लाबोल “ही सभा प्रचाराची नाही, विजयाची नांदी आहे” शिवसेनेच्या धनुष्यबाणासाठी १५ जानेवारीला मतदानाचे आवाहन मीरा भाईंदर, 12 : “मीरा भाईंदरवर बाळासाहेबांचे प्रेम होते. मुंबई भगवी आहे, ठाणे भगवे आहे आणि आता मीरा भाईंदरही भगवे होणारच,” असा
शहिदी समागमच्या ३५० व्या वर्षानिमित्त नांदेड येथे २४ व २५ रोजी भव्य कार्यक्रम
सिंधुदुर्गनगरी, 12: शिख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे येत्या २४ व २५ जानेवारी रोजी भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मिकी, भगत नामदेव
’हिंद दी चादर’ शहिदी स्मृती वर्षानिमित्त जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचा आढावा
नंदुरबार, 12 :‘हिंद-दी-चादर’ म्हणून इतिहासात अजरामर झालेले शीख धर्माचे गुरु, श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी स्मृती वर्षानिमित्त नांदेड येथे होत असलेल्या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांचा सखोल आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय आढावा बैठक घेण्यात आली.
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात पोलीस उप आयुक्त पुरुषोत्तम कराड यांची १३ व २० जानेवारी रोजी विशेष मुलाखत
मुंबई, 12 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या लोकप्रिय कार्यक्रमात ‘सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर आणि सायबर सुरक्षा’ या विषयावर सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त पुरुषोत्तम कराड यांची विशेष मुलाखत दोन भागांत प्रसारित होणार आहे. पहिला भाग दि. १३ व
