ST Reservation: SC-ST आरक्षणात ‘क्रिमी लेअर’ लागू होणार नाही; केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात स्पष्ट भूमिका!
नवी दिल्ली ०७: अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) आरक्षणात ‘क्रिमी लेअर’ चे तत्त्व लागू करण्यात यावे, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने आपली स्पष्ट भूमिका मांडत SC आणि ST आरक्षणात क्रिमी लेअर लागू करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.केद्राने न्यायालयात स्पष्ट केले की, SC आणि ST प्रवर्गाला दिले जाणारे आरक्षण हे केवळ आर्थिक स्थितीवर नसून, ऐतिहासिक आणि सामाजिक भेदभावाच्या आधारावर दिलेले आहे.
त्यामुळे या आरक्षण व्यवस्थेत क्रिमी लेअरचे तत्त्व लागू होऊ शकत नाही. तसेच, प्रसिद्ध ‘इंदिरा साहनी’ प्रकरणाचा हवाला देत सरकारने सांगितले की SC, ST आणि OBC यांची ओळख ही केवळ शैक्षणिक किंवा आर्थिक मागासलेपणापुरती मर्यादित नसून त्याला ऐतिहासिक सामाजिक पार्श्वभूमी आहे, आणि दाखल करण्यात आलेली याचिका या मूळ कायद्याकडे दुर्लक्ष करते.याशिवाय, सामाजिक न्याय मंत्रालयाने कोर्टात अधिक स्पष्टता देताना म्हटले की, संविधानाच्या कलम ३४१ आणि ३४२ नुसार SC/ST सूचीमध्ये कोणाचा समावेश करायचा किंवा कोणाला वगळायचे, यासंदर्भातील सर्व निर्णय आणि अधिकार हे केवळ संसदेकडेच आहेत!
