कामाच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिवसेना पोहोचवा…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेना राज्य प्रमुखांना आवाहन; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या सेवा कालावधीनिमित्त शिवसेनेकडून २५ राज्यांत रुग्णवाहिका देणार..महिला, युवक आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर स्थानिक पातळीवर काम करण्याच्या सूचना!
नवी दिल्ली: शिवसेना हा सर्वसामान्य जनतेचा आणि त्यांच्या हक्कांसाठी लढणारा पक्ष असून पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने आणि कार्यकर्त्याने आपल्या लोककल्याणकारी कामाच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या माणसापर्यंत शिवसेना पोहोचवावी, असे आवाहन पक्षाचे मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. तसेच शिवसेना देशातील २५ राज्यांत
