Thane: तिरंग्याच्या साक्षीने राष्ट्रभक्तीचा जागर; ओवळा-माजिवड्यात भव्य तिरंगा यात्रा..आमदार ॲड. निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत वर्तकनगरात उत्साह; ‘हर घर तिरंगा’चा संदेश घराघरात!
ठाणे १३ : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात बुधवारी भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्तकनगर येथे झालेल्या या यात्रेत युवा, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक
