केंद्र सरकारचा दिलासा… LPG सिलेंडर 200 रुपयांनी स्वस्त, पण घरगुती ग्राहकांची झळ कायम!
ताज्या बातम्या

केंद्र सरकारचा दिलासा… LPG सिलेंडर 200 रुपयांनी स्वस्त, पण घरगुती ग्राहकांची झळ कायम!

Aug 1, 2026

केंद्र सरकारने 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी (LPG) सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात केली आहे. यापूर्वी, पश्चिम आशियातील संकट आणि इराणमधील संघर्षामुळे जागतिक सर्वसामान्यांना वाढलेल्या किंमतीच्या झळा सोसाव्या लागत होत्या.केंद्र सरकारने हॉटेल्स, रेस्तराँ आणि इतर व्यावसायिक आस्थापनांना मोठा दिलासा देत, 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी (LPG) सिलेडरच्या किमतीत कपात केली आहे. एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत तब्बल 200 रुपयांची कपात झाली आहे. इराणमधील संघर्ष आणि पश्चिम आशियातील संकटामुळे गॅसच्या किमती सातत्याने वाढत असताना, दिलासा देणारा हा दुसरा महत्त्वाचा निर्णय आहे. मात्र, घरगुती ग्राहकांना कोणताही तात्काळ दिलासा मिळालेला नाही, कारण 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.तेल कंपन्यांनी कोलकाता, मुंबई, चेन्नई, पाटणा आणि लखनौ यांसारख्या देशभरातील इतर शहरांमध्येही व्यावसायिक सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत. कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये किमतीत वेगवेगळ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे.

कंपन्यांच्या या निर्णयामुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ढाबे, केटरर्स आणि लघु-व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळेल. याचा परिणाम सर्वसामान्यांवरही दिसून येईल, कारण बाजारातील खाद्यपदार्थांचे दर कमी होऊ शकतात. यापूर्वी, जेव्हा सिलिंडरच्या किमती 3000 रुपयांच्या वर गेल्या होत्या, तेव्हा बाजारात खाद्यपदार्थ आणि पेयांच्या दरांमध्ये मोठी वाढ दिसून आली होती.व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 200 रुपयांहून अधिक स्वस्तशनिवारी केंद्र सरकारने 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात जाहीर केली. नवीन दरानुसार, दिल्लीमध्ये व्यावसायिक सिलिंडरची किंमत 202 रुपयांनी कमी झाली आहे, तर कोलकातामध्ये 209 रुपयांनी कमी झाली आहे. नवीन दर त्वरित लागू झाले आहेत.घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल नाहीसरकारने स्पष्ट केलं आहे की, ही दरवाढ कपात केवळ 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरसाठी लागू आहे.

सध्या तरी, घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या 14..2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याचा अर्थ असा की, गॅसच्या दरांबाबत दिलासा मिळण्यासाठी घरगुती ग्राहकांना अजून वाट पाहावी लागेल.दोन महिन्यांत सिलेंडरच्या दरात 375 रुपयांची कपातयापूर्वी, १ जुलै रोजी तेल कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 183.50 रुपयांची ची मोठी कपात केली होती. जुलै आणि आता ऑगस्टमध्ये झालेल्या कपातीनंतर, व्यावसायिक गॅस सिलिंडर 375 रुपयांनी स्वस्त झाला आहे. जुलै महिन्यातील दरकपातीनंतर दिल्लीत सिलिंडरची किंमत 2930 रुपये होती; आता, आणखी 192 रुपयांची कपात झाल्यामुळे तो 2738 रुपयांना उपलब्ध आहे. पाटण्यात किंमत 3227 वरून 3018 पर्यंत खाली आली. त्याचप्रमाणे, लखनौमध्ये किंमत 3052.50 वरून2860.50 पर्यंत कमी झाली.सहा महिन्यांत दर दुप्पट झाले होते.

मध्य पूर्वेतील संघर्ष आणि इराणवरील निर्बंधांमुळे, भारतसह अनेक देशांना मार्च आणि एप्रिलमध्ये एलपीजीच्या (LPG) तुटवड्याचा सामना करावा लागला होता. परिणामी, तेल कंपन्यांनी व्यावसायिक सिलेंडरचे दर आणि पुरवठा यांबाबत बदल केले. किमतीत इतकी प्रचंड वाढ झाली होती की, जानेवारीत 1691.50 रुपये असलेला १९ किलोचा सिलिंडर जूनपर्यंत दुप्पट किमतीला, म्हणजेच 3113.50 रुपयांना विकला जात होता. मात्र, गेल्या महिन्यात दरात 174 ते 183.50 रुपयांची कपात करण्यात आली, ज्यामुळे किंमत 2930 वर आली.व्यावसायिक सिलिंडरवर सरकारने यापूर्वी घातलेले निर्बंध आधीच उठवण्यात आले आहेत. हे निर्बंध हटवल्यामुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि विवाह समारंभांसाठी व्यावसायिक एलपीजीची उपलब्धता सुलभ झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *