द्वारका-नाशिकरोड दहा पदरीकरणासाठी 244 कोटींची निविदा, चौकांमधून जाणार उड्डाणपूल, अंडपरपास; मेट्रोही मंजूर
ठळक बातम्या बातम्या

द्वारका-नाशिकरोड दहा पदरीकरणासाठी 244 कोटींची निविदा, चौकांमधून जाणार उड्डाणपूल, अंडपरपास; मेट्रोही मंजूर

Feb 15, 2026

2027मध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकरोड ते द्वारका रस्त्याचं दहा पदरीकरण मंजूर करण्यात आलं आहे. त्यासाठी महापालिका 244 कोटींची निविदा काढणार आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर द्वारका सर्कलवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अंडरपास मंजूर झाल्यानंतर आता द्वारका ते नाशिकरोड या आठ किलोमीटर लांबीच्या दहापदरी रस्त्यालाही केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे द्वारकासह या महामार्गावरील वाहतूक कोंडीही फुटणार आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (न्हाई) सूचनेनुसार ‘व्हाइट टॅपिंग’ ऐवजी डांबरीकरणाचा २४४ कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्याला ‘न्हाई’ ने मंजुरी दिल्यानंतर आता महापालिकेकडून या कामाची निविदा प्रक्रिया सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर द्वारका सर्कलपाठोपाठ द्वारका ते नाशिकरोड महामार्गावरील वाहतूक कोंडीही फुटणार आहे. स द्वारका येथून पुण्याकडे जाणाऱ्या महामार्गावरून नाशिकरोड, सिन्नर, शिर्डीकडे मोठ्या प्रमाणावर वाहने जातात. हा रस्ता शहरातील सर्वाधिक वाहतुकीचा आहे. परिणामी द्वारका चौक ते दत्त मंदिर सिग्नल यादरम्यान वारंवार वाहतूक कोंडी होते. त्यामुळे चार वर्षांपूर्वी भारतमाला योजनेअंतर्गत द्वारका ते दत्त मंदिर उड्डाणपूल मंजूर करण्यात आला होता. परंतु, निओ मेट्रोमुळे हा उड्डाणपूल अडचणीत आला होता.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *