सुट्टे तेल विक्रीवर बंदी आणि नियम मोडल्यास कारवाई!
महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दुधातील भेसळ रोखण्यासाठी कडक पावले उचलल्यानंतर, आता प्रशासनाने थेट खाद्यतेलाच्या बाजाराकडे मोर्चा वळवला आहे. या नवीन आदेशानुसार आजपासून संपूर्ण राज्यात सुट्ट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून, कोणत्याही दुकानदाराला उघड्यावर किंवा सुट्टे तेल विकता येणार नाही.
या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.याचसोबत तुकाराम मुंढे यांच्या कारवाईच्या रडारवर बॉलिवूड कलाकारही आले असून, शाहरूख खानसह अन्य कलाकारांना FDA कडून नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच अन्नात भेसळ असल्याचा संशय आल्यास नागरिकांना घरबसल्या QR Code स्कॅन करून थेट तक्रार नोंदवता यावी यासाठी FDA ने नवीन सुविधा सुरू केली आहे!
