Thane: मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ठाणे यांच्यावतीने सदनिका वाटपाची सोडत संपन्न!
ठळक बातम्या

Thane: मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ठाणे यांच्यावतीने सदनिका वाटपाची सोडत संपन्न!

Aug 14, 2026

ठाणे(१४) : मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, ठाणे यांच्या वतीने ठाणे पूर्व येथील धोबीघाट परिसरातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील पात्र लाभार्थ्यांसाठी सदनिकांच्या वाटपाची सोडत आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ राव यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली सदरची सोडत प्रक्रिया पार पडली.

समन्वय सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. व मित्रधाम सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या., टीका नं. २०, नगर भूमापन क्र. १०२५ अ (पे), धोबीघाट, कोपरी कॉलनी, ठाणे (पूर्व) येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील 310 निवासी पात्र लाभार्थ्यांसाठी ही सोडत आयोजित करण्यात आली होती. ठाणे पूर्व येथील आर्य हिंदी प्रचारिणी सभा, मंगला हिंदी हायस्कूल येथे ही सोडत प्रक्रिया पार पडली. सोडतीसाठी पात्र झोपडीधारकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून सहभाग नोंदविला.

मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पारदर्शक पद्धतीने सोडत प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या पुनर्वसन सदनिकांचे वाटप करण्याच्या प्रक्रियेला यामुळे महत्त्वाची गती मिळाली आहे. यावेळी नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा मीनल संख्ये, नगरसेविका मालती पाटील, सहाय्यक निबंधक रोहिदास बांगर, सहकारी अधिकारी दिपाली भाले, समन्वय व मित्रधाम सहकारी गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी तसेच लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सोडत प्रक्रिया शांततेत व पारदर्शक पद्धतीने पार पडल्याने लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, ठाणे यांच्याकडून पात्र लाभार्थ्यांना पुनर्वसन सदनिका हस्तांतरण करून देण्याच्या प्रक्रियेतील हा महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. सदनिका वाटपाची सोडत प्रक्रिया सुनियोजित पद्धतीने पार पाडल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *