Ajit Pawar plane crash : अजित पवारांच्या अपघातावरून राजकारण करू नका; सुनेत्रा पवारांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार!
ताज्या बातम्या न्यूज राजकारण

Ajit Pawar plane crash : अजित पवारांच्या अपघातावरून राजकारण करू नका; सुनेत्रा पवारांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार!

Sep 4, 2026

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूप्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा चांगलेच तापले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी या अपघाताप्रकरणी अद्याप एफआयआर गुन्हा का दाखल झाला नाही, असा सवाल करत राज्य सरकारला धारेवर धरले होते. अमित ठाकरे यांच्यावर तासाभरात गुन्हा दाखल होतो, मग अजित पवारांच्या अपघाताबाबत विलंब का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. या वक्तव्यावर उप मुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

“अजितदादांच्या जाण्याचे दुःख हे त्यांची आई, मुले आणि माझ्यापेक्षा जास्त कोणाला असणार?” असा सवाल करत सुनेत्रा पवार म्हणाल्या की, या दुर्दैवी अपघाताचे कोणीही राजकारण करू नये. आपला तपास यंत्रणांवर पूर्ण विश्वास असून त्यांना तपासासाठी आवश्यक तो वेळ दिला पाहिजे.या प्रकरणी त्यांनी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून, लवकरात लवकर योग्य चौकशी व्हावी यासाठी कुटुंब म्हणून प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, या विषयावर वारंवार ‘मीडिया ट्रायल’ करू नये, कारण सतत माध्यमांमध्ये अपडेट येणे म्हणजेच तपास होणे असे नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *