Aditi tatkare: धक्कादायक…मंत्री आदिती तटकरेंच्या जवळच्या सहकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; नेमंक काय घडलं?
Aditi Tatkare’s PRO Ashish Mete Dies : राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या कार्यालयात जनसंपर्क अधिकारी (PRO) म्हणून कार्यरत असणाऱ्या आशिष मेटे (वय ३० वर्षे) यांचा मुंबईतील भांडुप भागात अचानक दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अवघ्या ३० व्या वर्षी आशिष मेटे यांच्या झालेल्या अकाली निधनाने राजकीय व सामाजिक वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.नेमकी काय घडली घटना?मिळालेल्या माहितीनुसार, आशिष मेटे हे मुंबईतील भांडुप परिसरात आपल्या कुटुंबासह राहत होते. नेहमीप्रमाणे दैनंदिन कामकाज आटोपून ते घरी परतले होते.
रात्रीचे जेवण झाल्यानंतर ते शतपावली करण्यासाठी इमारतीच्या आवारात गेले असताना तिथेच खाली कोसळले आणि त्यांच्या डोक्याला मार लागला. याची माहिती समजतात तातडीने त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.मृत्यूचे कारण अस्पष्ट:आशिष मेटे यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्यानंतर मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे.
शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच त्यांच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.आशिष मेटे हे गेल्या काही काळापासून मंत्री आदिती तटकरे यांच्या जनसंपर्क आणि माध्यमांशी समन्वयाचे काम पाहत होते. आपल्या मनमिळाऊ आणि संयमी स्वभावामुळे त्यांचा राजकीय वर्तुळात आणि पत्रकार मित्रांमध्ये चांगला संपर्क होता. त्यांच्या या अचानक जाण्याने तटकरे यांच्या कार्यालयातील सहकाऱ्यांसह मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे!
