Thane: ठाण्यातील टेंभी नाक्यावर उसळला ‘ लाडक्या बहिणींचा’ जनसागर; आनंद आश्रमात रक्षाबंधन सोहळा उत्साहात साजरा…नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी शिवसेनेचे शर्थीचे प्रयत्न सुरू!
ठाणे दि. 28 :स्वर्गीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या काळापासून चालत आलेली रक्षाबंधनाच्या सणाची परंपरा यंदाही ठाण्यातील आनंद आश्रमात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो लाडक्या बहिणींनी मोठ्या विश्वासाने आणि आपुलकीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, ठाणे न्यायालयाचा कठोर निर्णय!
ठाणे, २९ ऑगस्ट : ठाण्यातील विशेष पॉक्सो न्यायालयाने शुक्रवारी एका २७ वर्षीय तरुणाला लग्नाचे आमिष दाखवून आणि तिच्या कुटुंबीयांना धमकावून १६ वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरवून २० वर्षांच्या सक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे.विशेष न्यायाधीश जी. टी. पवार यांनी आरोपी अनिकेत
Mumbai: तीव्र रक्तक्षयग्रस्त गरोदर मातांच्या उपचारांना गती मिळणार…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मातृ आरोग्याला प्राधान्य;जुलै २०२६ अखेर ९१ टक्के पात्र मातांना आयर्न सुक्रोज/फेरिक कार्बोक्सि माल्टोज इंजेक्शनचे उपचार!
मुंबई, दि. 28 : गर्भधारणा हा स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असून योग्य आहार व देखरेखीद्वारे माता व नवजात शिशुचे आरोग्य राखणे आवश्यक आहे. भारतात अंदाजे ५२ टक्के गर्भवती महिलांमध्ये रक्तक्षय आढळून येतो. रक्तक्षयामुळे प्रसूतीदरम्यान/नंतर मातेच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. तीव्र रक्तक्षय हे माता
Thane: ठाण्यात पाण्याची कमतरता तरीही गृहप्रकल्पांची जत्रा..बेशिस्त नियोजनावर आमदार संजय केळकर यांची आगपाखड!
ठाणे २८ : ठाणे शहराला ४० एमएलडी पाण्याची कमतरता भासत असताना शहरात मोठ्या प्रमाणात गगनचुंबी इमारतींची बांधकामे सुरू आहेत. परिणामी पाणी टंचाईसह अनेक समस्या गंभीर होणार आहेत. त्यामुळे शहराच्या हितासाठी राजकारणाच्या पलिकडे जाऊन निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत आमदार संजय केळकर यांनी व्यक्त
Maharashtra politics : मराठीच्या मुद्द्यावरून महायुतीत मतभेद; फडणवीसांच्या ‘त्या’ निर्णयावर शिंदेंचे मंत्री नाराज, खळबळजनक दावा आला समोर!
मराठी भाषेच्या मुद्द्यावरून सत्ताधारी महायुतीमधील शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद चांगलाच चिघळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी मुद्द्यावर घेतलेल्या निर्णयावर शिवसेनेचे मंत्री कमालीचे नाराज असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे. मुख्यमंत्र्यांनी विश्वासात घेऊन निर्णय घेतला नसल्याने
ठाणे मध्यवर्ती कारागृहात रक्षाबंधनाचा स्नेहबंध“भिंती कारागृहाच्या असल्या, तरी प्रेमाच्या नात्यांना कोणत्याही भिंती नसतात!
ठाणे २८ : मा.डॉ.सुहास वारके, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे प्रेरणेतुन व मा.श्री. योगेश देसाई,विशेष कारागृह महानिरीक्षक,कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे मध्यवर्ती कारागृहात रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला कारागृहातील जीवन हे शिस्त,
Thane : Marathi Sahitya Sammelan 2027 : 100 व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ठाणे शहराला मिळावे!
ठाणे २८ : गेल्या 100 वर्षात आत्तापर्यंत एकदाही ठाणे शहराला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला नाही याची दखल घेऊन किमान जानेवारी 2027 मध्ये पुणे येथे होणार्या 100 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ठाणे शहरातील साहित्यिकाला बहुमान मिळावा अशी मागणी ठाणे शहरातील
Dombivli : डोंबिवलीकर दररोज गिळतात घाणीतील बर्फ? कचऱ्याशेजारी बर्फाच्या लाद्या!
डोंबिवली २८ – डोंबिवली पूर्व बाजीप्रभू चौकातील पाटकर प्लाझा जवळील मोकळ्या जागेत अनेक वर्ष एक विक्रेता बर्फाच्या लाद्या डोंबिवली शहर परिसरातील हाॅटेल्स, रसवंती गृह, बार आणि इतर व्यावसायिक, व्यापाऱ्यांना विक्री करतो. हे बर्फाचे साठा केंद्र अलीकडे कचरा, दुर्गंधी, मलनिस्सारणाचे पाणी यांनी वेढलेले असते.
Milk Price Hike: सणासुदीच्या दिवसांत मुंबईकरांना महागाईचा फटका, दूधाच्या दरात ९ रुपयांची वाढ!
मुंबईकरांचे टेन्शन वाढवणारी बातमी आहे. सणासुदीच्या काळात मुंबईकरांना मोठा झटका बसला आहे. मुंबईमध्ये दुधाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. दूध उत्पादकांनी एक लिटर दुधाचे दर ९ रुपयांनी वाढवले आहेत. अचानक दुधाच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे मुंबईकरांच्या महिन्याच्या बजेटवर परिणाम होण्याची शक्यता आहे.मुंबईमध्ये दुधाच्या
Manoj jarange: मनोज जरांगे आंदोलनावर ठाम…आधी आंतरवाली सराटी एल्गार, नंतर चलो मुंबईचा नारा; संपूर्ण आंदोलनाचा प्लान सांगितला!
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. ते उपोषणावर ठाम आहेत. उद्यापासून ते उपोषणाला सुरुवात करणार आहेत. आधी आंतरवाली सराटीमध्ये ते एल्गार करणार, त्यानंतर ‘चलो मुंबई’चा नारा देणार आहेत. उपोषणाला बसण्यापूर्वी त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.
