Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनाला लाडक्या बहिणींना ३ हजार रुपये मिळणार? सरकारची भूमिका काय, जाणून घ्या!
ताज्या बातम्या

Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनाला लाडक्या बहिणींना ३ हजार रुपये मिळणार? सरकारची भूमिका काय, जाणून घ्या!

Aug 3, 2026

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो. जून महिन्याचा हप्ता १५ जुलै रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला. त्यामुळे आता जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार, याकडे महिलांचे लक्ष लागले आहे.


दरम्यान, यंदा २८ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण असल्याने जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे मिळून एकत्रित ३,००० रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. गेल्या वर्षीही काही लाभार्थींना दोन महिन्यांचे हप्ते एकत्र मिळाले होते. त्यामुळे यंदाही तशी शक्यता व्यक्त केली जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, जुलै महिन्याचा हप्ता १५ ऑगस्टपर्यंत जमा होण्याची शक्यता आहे. जर त्या कालावधीत जुलैचा हप्ता जमा झाला नाही, तर जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे मिळून ३,००० रुपये एकाच वेळी खात्यात जमा होऊ शकतात.


मात्र, याबाबत राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सरकारच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी. अधिकृत निर्णय जाहीर झाल्यानंतरच ३,००० रुपये एकत्र मिळणार की नाही, हे स्पष्ट होणार आहे.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *