Mahatma jotirav phule: राज्यात ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’..१ सप्टेंबर पासून अभियानाला सुरुवात!
ताज्या बातम्या

Mahatma jotirav phule: राज्यात ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’..१ सप्टेंबर पासून अभियानाला सुरुवात!

Sep 1, 2026

महसूल विभागातील प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणे परस्पर संमती व तडजोडीने जलदगतीने निकाली काढण्यासाठी राज्यभर ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ राबविण्यात येणार आहे. १ सप्टेंबर, २०२६ ते ३१ मार्च, २०२७ या कालावधीमध्ये हे अभियान राबविले जाणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारातून हा निर्णय घेण्यात आला आहे. मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), अपर जिल्हाधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयांतील प्रलंबित महसुली दावे व अपीलांचा या अभियानात समावेश असेल.

दर तीन महिन्यांनी लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. पक्षकारांच्या संमतीने तडजोडनामा करून अंतिम आदेशाद्वारे प्रकरणे कायमस्वरूपी निकाली काढली जाणार आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून अभियानाचे वेळापत्रक निश्चित करण्यात येणार आहे!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *