Mumbai: स्त्रीशक्तीच्या कर्तृत्वाचा गौरव आरोग्य सेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी सौ. तेजस्विनी सांबरे-जाधव यांना ‘तिची सफर सन्मान’!
ताज्या बातम्या मुंबई

Mumbai: स्त्रीशक्तीच्या कर्तृत्वाचा गौरव आरोग्य सेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी सौ. तेजस्विनी सांबरे-जाधव यांना ‘तिची सफर सन्मान’!

Aug 25, 2026

मुंबई २५ : समाजातील गरजू घटकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या आरोग्य विभागाच्या प्रमुख सौ. तेजस्विनी सांबरे-जाधव यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना ‘जी २४ तास प्रस्तुत तिची सफर सन्मान’ या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात आले.विशेष म्हणजे, स्त्रियांच्या कर्तृत्वाचा आणि सामाजिक योगदानाचा गौरव करणाऱ्या या विशेष सोहळ्यात केवळ महिलांचाच सन्मान करण्यात आला. विविध क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या कर्तृत्ववान महिलांमध्ये सौ. तेजस्विनी सांबरे-जाधव यांची निवड होणे ही जिजाऊ परिवारासाठी अभिमानाची बाब ठरली.

महिला व बालविकास मंत्री मा. आदिती तटकरे यांच्या शुभहस्ते तसेच नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय व वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री मा. माधुरी मिसाळ यांच्या विशेष उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.जिजाऊच्या माध्यमातून ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांसाठी आरोग्यसेवा, आरोग्य शिबिरे, मोफत उपचार तसेच गरजू रुग्णांना आवश्यक वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे. या जनसेवेच्या कार्याला प्रभावी दिशा देण्यात सौ. तेजस्विनी सांबरे-जाधव यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय कार्याची दखल घेत मिळालेला हा सन्मान जिजाऊच्या सेवाभावी कार्याला मिळालेली महत्त्वपूर्ण पावती ठरली आहे!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *