Nalasopara:नालासोपाऱ्यात वाढदिवसाचा केक खाल्याने ११ जणांना विषबाधा!
अन्न सुरक्षा ताज्या बातम्या

Nalasopara:नालासोपाऱ्यात वाढदिवसाचा केक खाल्याने ११ जणांना विषबाधा!

Aug 16, 2026

नालासोपारा १६ : नालासोपारा पूर्वेतील निळकंठेश्वर इमारतीमध्ये शनिवारी रात्री एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुटुंबीय आणि शेजारी राहणारी लहान मुले एकत्र जमली होती. केक कापल्यानंतर उपस्थितांनी तो खाल्ला; मात्र काही वेळातच त्यांना मळमळ, उलट्या आणि इतर त्रास जाणवू लागला.

या अन्नाच्या विषबाधेमुळे ७ अल्पवयीन मुले आणि ४ महिला अशा एकूण ११ जणांची प्रकृती बिघडली. कुटुंबीयांनी तत्परता दाखवत सर्वांना नालासोपारा पूर्वेतील टाकीपाडा येथील विजयलक्ष्मी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली सर्वांवर उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून विषबाधेचे अचूक कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संबंधित केकची तपासणी करण्यात येणार आहे!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *