Narendra Modi :राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट!
न्यूज राजकारण

Narendra Modi :राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट!

Aug 11, 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदारांच्या शिष्टमंडळासह देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांची सदिच्छा भेट घेतली.या बैठकी दरम्यान माझ्या भिवंडी लोकसभा मतदार संघातील नागरिक, प्रवासी आणि स्थानिक भूमिपुत्रांच्या जिव्हाळ्याच्या व महत्त्वाच्या प्रश्नांकडे माननीय पंतप्रधानांचे लक्ष वेधले आणि खालील प्रमुख मागण्यांचे निवेदन सादर केले:

🔹टोरेंट पॉवर कंपनी भिवंडीतून हटवणे:भिवंडी शहरातील ग्राहक, व्यावसायिक व व्यापाऱ्यांना टोरेंट पॉवरकडून होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन, भिवंडीतून टोरेंट पॉवरची सेवा तात्काळ रद्द करून ती हटवण्यात यावी.

🔹कल्याण – मुरबाड रेल्वे प्रकल्पाचे काम त्वरित सुरू करणे:मुरबाड व परिसरातील दळणवळण सुलभ करण्यासाठी कल्याण – मुरबाड रेल्वे मार्गाच्या कामाला गती देऊन प्रत्यक्ष कामाला लवकरात लवकर सुरुवात करण्यात यावी.

🔹 नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘लोकनेते दि. बा. पाटील’ यांचे नाव देणे: स्थानिक भूमिपुत्रांच्या अस्मितेचा व भावनांचा आदर करत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नाव देण्याची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करावी.

🔹भिवंडी लोकल सेवा सुरू करणे:भिवंडीतील हजारो चाकरमाणी, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांच्या रोजच्या प्रवासाचा त्रास कमी करण्यासाठी भिवंडी लोकल सेवा तात्काळ सुरू करण्यात यावी.

🔹बदलापूर रेल्वे स्थानकाची दुरावस्था व सुधारणा:बदलापूर रेल्वे स्थानकातील बिकट अवस्था, अपुऱ्या सुविधा व प्रवाशांची होणारी कोंडी लक्षात घेता, स्थानकाचे नूतनीकरण करून तेथे अद्ययावत नागरी सुविधा तातडीने पुरवण्यात याव्यात.भिवंडी लोकसभेच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या या समस्यांवर माननीय पंतप्रधानांनी लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेऊन संबंधित विभागांना निर्देश द्यावेत, अशी आग्रही विनंती केली.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *