Ncp: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलांची शक्यता: प्रशांत किशोर यांचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला!
न्यूज राजकारण

Ncp: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलांची शक्यता: प्रशांत किशोर यांचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला!

Aug 7, 2026

मुंबई ०७ : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येत्या काळात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची भेट घेऊन पक्षाच्या राज्य नेतृत्वाबाबत दीर्घकाळ चर्चा केली आहे. या बैठकीत प्रशांत किशोर यांनी पक्षाचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या जागी नवीन चेहरा आणण्याची, म्हणजेच प्रदेशाध्यक्ष बदलण्याची महत्त्वाची शिफारस केली आहे. याशिवाय पक्षबांधणी, संघटनात्मक रचना आणि आगामी राजकीय रणनीतीमध्येही मोठे बदल सुचवण्यात आले आहेत.

गेल्या काही दिवसांत पक्षाबाबत होणारी नकारात्मक चर्चा थांबवण्यासाठी आणि पक्षाची प्रतिमा अधिक मजबूत करण्यासाठी हे संघटनात्मक बदल अत्यंत आवश्यक असल्याचे मत या बैठकीत व्यक्त करण्यात आले. पक्षाला असा नवा प्रदेशाध्यक्ष मिळावा, ज्याच्यावर इतर कोणतीही अतिरिक्त जबाबदारी नसेल आणि जो पूर्णवेळ राज्यात राहून पक्षबांधणी व संघटनात्मक कामात सक्रिय राहू शकेल, अशी विशेष शिफारस प्रशांत किशोर यांनी केली आहे. प्रशांत किशोर यांच्या या सल्ल्यामुळे आणि संभाव्य बदलांच्या चर्चेमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत गोटात मोठी खळबळ उडाली आहे!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *