PM Narendra Modi Meet : पंतप्रधान मोदींच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण; सुप्रिया सुळेंचे स्पष्टीकरण तर विरोधकांचे दावे!
न्यूज राजकारण

PM Narendra Modi Meet : पंतप्रधान मोदींच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण; सुप्रिया सुळेंचे स्पष्टीकरण तर विरोधकांचे दावे!

Aug 10, 2026

मुंबई १०: राजकीय वर्तुळातून एक मोठी घडामोडी समोर येत असून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आठ खासदार आज सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या भेटीसाठी पंतप्रधान कार्यालयाकडे रीतसर वेळ मागण्यात आली होती. ही भेट राजकीय नसून केवळ मतदारसंघातील अडचणी आणि राज्याच्या विकासाचे विविध मुद्दे मांडण्यासाठीच आयोजित करण्यात आल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

मात्र, या प्रस्तावित भेटीमुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याच्या जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत. शरद पवारांचे खासदार पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत असल्याने काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका करत “राष्ट्रवादीचे नेते मोदी-शाहांच्या दरबारात नतमस्तक होत असून नक्कीच काहीतरी नवे शिजत आहे” असा दावा केला आहे. दुसरीकडे, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या असून “महाविकास आघाडी पूर्णपणे भक्कम आहे आणि कोणीही कुठेही जाणार नाही,” असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *