Pratap sarnaik: मिरा-भाईंदरमधील वाढीव बांधकामांच्या नियमानुकूलतेसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा 3 सप्टेंबर रोजी पाहणी दौरा!
ताज्या बातम्या

Pratap sarnaik: मिरा-भाईंदरमधील वाढीव बांधकामांच्या नियमानुकूलतेसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा 3 सप्टेंबर रोजी पाहणी दौरा!

Sep 1, 2026

ठाणे,दि.०१ : मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील उत्तन, मूर्धा, नवघर, घोडबंदर आणि काजूपाडा येथील जुने आदिवासी पाडे, आगरी व कोळी वसाहती तसेच जुन्या गावांमधील वाढीव बांधकामे नियमानुकूल करण्यासंदर्भातील धोरण ठरविण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे आगामी गुरुवार, दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजल्यापासून पाहणी दौरा करणार आहेत.

स्थानिक नागरिकांच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या बांधकामांच्या प्रश्र्नांवर तात्काळ व योग्य तोडगा काढण्याच्या उद्देशाने हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. या पाहणी दौऱ्यादरम्यान मंत्री महोदय प्रामुख्याने खालील भागांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत:


• उत्तन आणि मूर्धा : येथील स्थानिक वसाहतींमधील वाढीव बांधकामांची पाहणी.
• नवघर : परिसरातील अनधिकृत व वाढीव बांधकामांचा आढावा.
• स्टील असोसिएशन : जुन्या गाळ्यांची उंची वाढविणेबाबत धोरण ठरविण्याबाबत चर्चा व पाहणी.
• घोडबंदर आणि काजूपाडा : जुने आदिवासी पाडे, आगरी-कोळी वसाहती आणि जुनी गावे येथील वाढीव बांधकामांच्या नियमितीकरणाबाबत प्रत्यक्ष स्थलदौरा.


या पाहणी दौऱ्यामुळे मिरा-भाईंदर परिसरातील जुन्या वसाहतींमधील वाढीव बांधकामांच्या नियमानुकूलतेचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागून नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यादरम्यान महापालिकेचे संबंधित अधिकारी आणि स्थानिक प्रतिनिधी देखील उपस्थित राहणार आहेत!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *