Shivsena: शिवसेना कुणाची? सर्वोच्च न्यायालयात आज निर्णायक सुनावणी!
राजकारण

Shivsena: शिवसेना कुणाची? सर्वोच्च न्यायालयात आज निर्णायक सुनावणी!

Aug 5, 2026

Shivsena ०५ : शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. या प्रकरणाची सुनावणी आज दुपारी २ वाजता घेण्यात यावी, अशी विनंती ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी न्यायालयाकडे केली होती. सर्वोच्च न्यायालयाने ही विनंती मान्य केली असून, दुपारी २ वाजता या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.बार कौन्सिल ऑफ इंडिया आणि डिजिटल अरेस्टसंबंधित इतर प्रकरणांमुळे या सुनावणीला विलंब झाला होता. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे या सुनावणीकडे लक्ष लागले असून, पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *