Tuljabhavani temple: नागपंचमीनिमित्त तुळजाभवानी मंदिरात पुरुषांच्या प्रवेशावर निर्बंध; मंदिर संस्थानाचे भाविकांना महत्त्वाचे आवाहन!
ताज्या बातम्या न्यूज

Tuljabhavani temple: नागपंचमीनिमित्त तुळजाभवानी मंदिरात पुरुषांच्या प्रवेशावर निर्बंध; मंदिर संस्थानाचे भाविकांना महत्त्वाचे आवाहन!

Aug 17, 2026

तुळजाभवानी मंदिर १७ : नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिर संस्थानांकडून भाविकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे.पूर्वापार चालत आलेल्या धार्मिक आणि पारंपरिक प्रथेनुसार, नागपंचमीच्या दिवशी सायंकाळी ५ ते ६ या वेळेत तुळजाभवानी मंदिरात पुरुष भाविकांना प्रवेश पूर्णपणे बंद राहणार आहे. नागपंचमी हा सण महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि शहरी भागात मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. या दिवशी नागदेवतेची पूजा करण्याची परंपरा असून, अनेक ठिकाणी महिलांकडून विविध पारंपरिक धार्मिक विधी केले जातात. तुळजाभवानी मंदिरातही या निमित्ताने सुवासिनी महिलांकडून नागपूजनासह फेर-भुलई आणि इतर पारंपरिक कार्यक्रमांचे विशेष आयोजन केले जाते.

सायंकाळच्या या वेळेत महिलांकडून मंदिर परिसरात पारंपरिक पद्धतीने सर्व धार्मिक विधी आणि खेळ पार पडतात.या कार्यक्रमांना पूर्वापार चालत आलेले धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. याच परंपरेचे पालन करत दरवर्षी या ठराविक वेळेत पुरुषांच्या मंदिर प्रवेशावर निर्बंध घातले जातात. यंदाही सायंकाळी ५ ते ६ या वेळेत सुवासिनी महिलांकडून नागपूजन आणि पारंपरिक कार्यक्रम पार पडणार असल्याने पुरुष भाविकांना मंदिरात प्रवेश करता येणार नाही.दरम्याने, नागपंचमीच्या दिवशी तुळजाभवानी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या पुरुष भाविकांनी या वेळेची विशेष नोंद घेऊनच आपल्या दर्शनाचे नियोजन करावे आणि मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर संस्थानाकडून करण्यात आले आहे!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *