Uddhav Thackeray: ठाकरे गटाला धक्का: माजी महापौर विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द होणार?
ताज्या बातम्या राजकारण

Uddhav Thackeray: ठाकरे गटाला धक्का: माजी महापौर विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द होणार?

Aug 21, 2026

मुंबई २१ : मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.तथापि, या निर्णयाचा विषय अद्याप मुंबई महापालिका सभागृहासमोर आलेला नाही. हा मुद्दा महापालिकेच्या सभागृहात मांडला गेल्यानंतरच नगरसेवक पद अधिकृतपणे रद्द होण्यावर चर्चा होऊन पुढील निर्णय घेतला जाईल.

त्यामुळे विशाखा राऊत यांच्या नगरसेवक पदाबाबतचा अंतिम निर्णय अद्याप प्रलंबित आहे. हा विषय सभागृहात मांडल्यावर यावर नेमकी काय चर्चा होते आणि त्यांचे पद रद्द करण्यामागील नेमकी काय कारणे आहेत, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *