छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यास भारतीय रेल्वेने दिली मंजुरी!
ताज्या बातम्या वाहतूक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यास भारतीय रेल्वेने दिली मंजुरी!

Aug 4, 2026

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस ट्रेन सुरु करण्यास भारतीय रेल्वेने मंजुरी दिल्याबद्दल आज नवी दिल्लीत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचा शिवसेना पक्षाच्या वतीने तसेच कोकण वासियांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी संसदीय गटनेते डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के, महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, खासदार संजय दिना पाटील, खासदार श्रीरंग बारणे, खासदार ओम राजे निंबाळकर यावेळी उपस्थित होते. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी ही ट्रेन सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला होता. कोकण रेल्वे मार्गावर ही ट्रेन नियमित धावणार असून 22 स्थानकांवर ट्रेनला थांबा मिळाला आहे. या नवीन ट्रेन मुळे गणपतीमध्ये गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी सोय होणार असून नियमित प्रवास करणाऱ्या कोकणवासीयांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *