दहीहंडीऐवजी रक्षाबंधनला मिळणार सुट्टी; सरकारी सुट्ट्यांच्या नियोजनात मोठा बदल, सरकारचा महत्वपूर्ण निर्णय!
ताज्या बातम्या

दहीहंडीऐवजी रक्षाबंधनला मिळणार सुट्टी; सरकारी सुट्ट्यांच्या नियोजनात मोठा बदल, सरकारचा महत्वपूर्ण निर्णय!

Aug 11, 2026

मुंबई ११ :महाराष्ट्रात आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर राज्य प्रशासनाकडून स्थानिक सरकारी सुट्ट्यांच्या वेळापत्रकात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. फडणवीस सरकारने घेतलेल्या या निर्णयानुसार दहीहंडीची स्थानिक सुट्टी रद्द करून आता रक्षाबंधनाला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. २८ ऑगस्ट रोजी ही सुट्टी देण्यात आली असून यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक प्रशासनाकडून जारी करण्यात आले आहे.शासकीय नोंदींनुसार यंदा गोपाळकाला म्हणजेच दहीहंडीचा सण ५ सप्टेंबर रोजी साजरा होणार आहे, तर भावा-बहिणीच्या प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा सण असलेला रक्षाबंधन २८ ऑगस्ट रोजी आहे.

मुंबई, ठाणे आणि महाराष्ट्रातील विविध भागांत दहीहंडीचा उत्सव मानवी मनोरे, ढोल-ताशे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या जल्लोषात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. असे असले तरी, यंदाच्या स्थानिक सुट्टीच्या नियोजनात दहीहंडीऐवजी रक्षाबंधनाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.अधिकृत पत्रकानुसार ५ सप्टेंबरला दहीहंडी आणि २८ ऑगस्टला रक्षाबंधन नमूद असून, या निर्णयामुळे सणांच्या काळात सुट्ट्यांचे नियोजन करणाऱ्या नागरिकांना, विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना आपल्या वेळापत्रकात काहीसा बदल करावा लागणार आहे. त्यामुळे सर्वांनी सुट्टीचा नेमका दिवस आणि लागू क्षेत्राबाबत प्रशासनाच्या अधिकृत सूचनेची खात्री करून घेणे आवश्यक आहे!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *