अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष मोठ्या अडचणीत? निवडणूक आयोगाचे थेट सुनेत्रा पवार यांना पत्र!
Sunetra ajit pawar: निवडणूक आयोगाच सुनेत्रा पवार यांना पत्र पाठवले आहे. पक्षामधील बंदलाचे कागदपत्र सादर करा असे निर्देश देण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाकडून वैध कागदपत्र, प्रस्तावांची मागणी करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर आक्षेप घेण्यात आला होता. राष्ट्रवादीचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी हा आक्षेप घेतला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची अध्यक्षपदी झालेली निवड घटनेला धरून नसल्याचा दावा सच्चिदानंद यांनी केला होता. यांनतर आता भारतीय निवडणूक आयोगाने 27 जुलै, 2026 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना एक पत्र पाठवले आहे. पक्षाच्या घटनेतील अनेक बदलांना समर्थन देणारी आवश्यक कागदपत्रे आणि प्रस्ताव सादर करण्यात आलेले नाहीत असे आयोगाने या पत्रात म्हंटले आहे.आयोगाच्या मते, 26 फेब्रुवारी, 2026 रोजीच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या ठरावात केवळ कलम १८(१) मध्ये दुरुस्तीचा उल्लेख आहे. तथापि, पक्षाने कलम 6, 7, 12, 32 आणि 36 मध्येही बदल केले आहेत. या बदलांना मान्यता देणारे प्रस्ताव आयोगाला प्राप्त झालेले नाहीत.
त्यामुळे, आयोगाने या दुरुस्त्यांच्या समर्थनार्थ पक्षाकडून वैध कागदपत्रे आणि प्रस्तावांची मागणी केली आहे.जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दुरुस्त्यांच्या समर्थनार्थ आयोगाला वैध प्रस्ताव आणि कागदपत्रे सादर करण्यात अयशस्वी ठरला, तर अनेक मोठे प्रश्न निर्माण होऊ शकतात. पक्षाची सध्याची राष्ट्रीय कार्यकारिणी वैध आहे का? राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका नियमांनुसार करण्यात आल्या होत्या का? असे प्रश्न निवडणुक आयोगाने उपस्थित केले आहेत. सुधारित घटनेच्या आधारावर घेतलेले संघटनात्मक निर्णय कायदेशीरदृष्ट्या योग्य आहेत का? अशा परिस्थितीत, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्या कायदेशीर दर्जावर आणि त्यांनी केलेल्या संघटनात्मक नियुक्त्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते.
तथापि, या प्रकरणावरील अंतिम निर्णय निवडणूक आयोगाच्या तपासावर आणि उपलब्ध कागदपत्रांवर अवलंबून असेल. आयोगाने अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही. आयोगाने केवळ आवश्यक कागदपत्रे आणि प्रस्ताव मागवले आहेत. तथापि, जर पक्ष ती सादर करण्यात अयशस्वी ठरला, तर पक्षाची सुधारित घटना, राष्ट्रीय कार्यकारिणी, राष्ट्रीय पदाधिकारी आणि संघटनात्मक नियुक्त्यांच्या वैधतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते.
