उद्धव ठाकरेंचा भाजप-राष्ट्रवादीला मोठा दणका.. शिंदेंच्या खासदारा विरोधात डाव टाकला, बड्या नेत्याला ठाकरे गटात एंट्री!
ताज्या बातम्या राजकारण

उद्धव ठाकरेंचा भाजप-राष्ट्रवादीला मोठा दणका.. शिंदेंच्या खासदारा विरोधात डाव टाकला, बड्या नेत्याला ठाकरे गटात एंट्री!

Aug 20, 2026

धाराशिव २०: धाराशिवमध्ये उद्धव ठाकरे यांनी मोठी राजकीय खेळी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निंबाळकर आणि भाजपचे नेते रामेश्वर शेटे यांच्यासह अनेक नेत्यांनी मातोश्रीवर ठाकरे गटात प्रवेश केला.ऑपरेशन टायगरमध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे ६ खासदार गळाला लावले. यामध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना उद्धव ठाकरे यांनी शेवटपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न केला. आमदार वरुण सरदेसाई आणि आमदार कैलास पाटील हे स्वतः ठाकरेंमार्फत ओमराजे यांची मनधरणी करण्यासाठी त्यांच्याकडे गेले होते. मात्र, ओमराजे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाच. यानंतर उद्धव ठाकरे यांनी धाराशिवमध्ये सभा घेत ओमराजे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता.

अशातच उद्धव ठाकरे यांनी २०२९ च्या निवडणुकीसाठी ओमराजे यांच्या विरोधात बड्या नेत्याला गळाला लावले आहे.धाराशिवचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निंबाळकर आणि भाजपचे नेते रामेश्वर शेटे यांनी मातोश्री येथे ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी धाराशिव जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते त्यांच्या सोबत उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी संजय निंबाळकर यांच्या मनगटावर शिवबंधन बांधत पक्षाेत स्वागत केले.निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते म्हणून परिचित आहेत. तर रामेश्वर शेटे हे भाजपमध्ये होते. या दोघांच्या पक्षप्रवेशासाठी धाराशिव जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थित झालेल्या या प्रवेशामुळे ठाकरे गटाने धाराशिवमध्ये २०२९ ची लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी करत असल्याचे बोलले जात आहे.

कोणत्या नेत्यांनी हाती घेतली मशाल?

धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे संजय निंबाळकर, भाजपचे रामेश्वर शेटे, रामभाऊ पडवळ, भीमराव साळुंके, अतुल बागल, शिवशंकर शिंदे यांनी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. यावेळी धाराशिव जिल्हाप्रमुख आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी, संपर्कप्रमुख मकरंदराजे निंबाळकर आणि इतर पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *