काँग्रेस कार्यालयाबाहेरील  आंदोलनाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार) पदाधिकाऱ्यांवर  गुन्हे दाखल!
ठाणे न्यूज

काँग्रेस कार्यालयाबाहेरील आंदोलनाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार) पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल!

Aug 5, 2026

ठाणे ०५ : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनानंतर ठाणे शहर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत काल रात्री नगर पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधितांवर तातडीने कारवाईची मागणी केली होती.राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कार्यालयाबाहेर करण्यात आलेल्या आंदोलनानंतर ठाणे काँग्रेस कार्यकर्ते संतापले असून शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे काँग्रेस अध्यक्षा राहुल पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी नगर पोलीस ठाणे गाठून पोलिसांना निवेदन सादर केले होते.

घडलेल्या आंदोलन प्रकरणी राहुल पिंगळे यांच्यासह ठाणे काँग्रेसचे माजी अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठाणे नगर पोलिस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री चौधरी यांची भेट घेत घटनेचे गांभीर्य निदर्शनास आणून दिले असता संबंधितांवर तातडीने भारतीय न्याय संहिता ( बी एन एस ), 2023 189,285,324,329,351(2),352 कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले की गुन्हा दाखल झाल्याने कायद्यापुढे सर्व समान आहेत आणि प्रशासनाने कोणालाही पाठीशी घालू नये.

सदर प्रसंगी ॲड. प्रभाकर थोरात, ॲड. दरम्यान सिंह, ॲड. हिदायत मुकदम, ॲड.वसंत जगदाळे, ॲड.मनोज डाकवे महेंद्र म्हात्रे,नाना कदम, रवी कोळी, स्मिता वैती,धर्मवीर मेहरोल, संगीता कोटल,शांती इलावडेकर, निलेश पाटील,निलेश अहिरे,राजू शेट्टी,प्रवीण खैरालिया,वसीम सय्यद,शिरीष घरत, हर्षल कोळी,चंद्रकांत पाटील,प्रसाद पाटील,यासीन मोमिन,सुभाष ठोंबरे,प्रकाश मांडवकर,मुन्ना राजोरिया,दर्शन कानडे,नरेश कॅरम कोंडा,वीरेंद्र गुप्ता,अंकुश चिंडालिया,गोपाळ सावंत,मनोज दुबे, श्रीकांत गाडीलकर, पप्पू मोमिन,विकास मेस्ता,अंजली मयेकर,प्रियांका मयेकर,वैशाली भोसले, शकिला शेख, जसप्रीत कौर,बिलाल तांबोळी यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेसने या प्रकरणात कोणालाही पाठीशी न घालता त्वरित आणि निष्पक्ष कारवाई करावी असे मागणी पुन्हा एकदा केली.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *