ठाणे शहरात सुरू असलेले फेरीवाल्यांचे पुनःसर्वेक्षण पूर्णपणे मोफत; पैशाची मागणी झाल्यास तक्रार करण्याचे महापालिकेचे आवाहन!
ठाणे

ठाणे शहरात सुरू असलेले फेरीवाल्यांचे पुनःसर्वेक्षण पूर्णपणे मोफत; पैशाची मागणी झाल्यास तक्रार करण्याचे महापालिकेचे आवाहन!

Jul 31, 2026

ठाणे, (31) : ठाणे महानगरपालिका हद्दीतील सर्व फेरीवाल्यांच्या पुनःसर्वेक्षणास 26 जून 2026 रोजी पासून सुरुवात करण्यात आली आहे. हे सर्वेक्षण पूर्णपणे नि:शुल्क असून त्यासाठी कोणत्याही फेरीवाल्याने कोणालाही पैसे देऊ नयेत. सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचारी अथवा प्रतिनिधींनी पैशांची मागणी केल्यास संबंधित प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांकडे तात्काळ तक्रार करावी, असे आवाहन आवाहन महापालिकेने केले आहे.फेरीवाला (उपजीविकेचे संरक्षण व पथविक्रेता विनियमन) अधिनियम, 2014 चे कलम 38 मधील तरतुदीनुसार राज्य शासनाने तयार केलेल्या महाराष्ट्र पथविक्रेता (उपजीविकेचे संरक्षण व पथविक्री विनियमन) (महाराष्ट्र) योजना, 2017 तयार केली आहे.

सदर योजनेतील तरतुदीनुसार पहिल्या सर्वेक्षणानंतर प्रत्येक पाच वर्षांनी पुनःसर्वेक्षण करणे आवश्यक आहे. त्यानुसार ठाणे महानगरपालिकेने शहरातील सर्व फेरीवाल्यांचे पुनःसर्वेक्षण हाती घेतले असून हे काम मे.विदसिद्ध इन्फोटेक या संस्थेमार्फत केले जात आहे. सर्वेक्षणाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाी सर्वेक्षणासाठी पैशाची मागणी केल्यास संबंधित कर्मचाऱ्यांची तक्रार प्रभाग समिती सहायक आयुक्तांकडे करावी असे आवाहन अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *