ठाण्यात उभे राहणार भव्य पत्रकार भवन.. गावदेवी येथील पत्रकार भवनाची जागा ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाला देण्याचा होणार निर्णय!
ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलेल्या निवेदनात जिल्हा पत्रकार संघाच्या भवनाची जागा गैरव्यवहार आणी शर्तभंग झाल्यामुळे शासनाच्या ताब्यात असून सदरची जागा ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाला देण्यात यावी अशी मागणी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष दिलीप शिंदे यांनी आज महसूल मंत्र्यांकडे केली असता त्यांनी येत्या पंधरा दिवसात पुण्याच्या धर्तीवर प्रस्ताव मंजूर करण्यासाठी पुढील कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांना निर्देश दिले.
यावेळी संघाचे कार्याध्यक्ष दीपक शेलार,सेक्रेटरी राजीव डाके सदस्य अमर राजभर,निकेश शार्दुल,गजानन हरिमकर, नितीन दूधसागर,सारिका साळुंखे, जेष्ठ पत्रकार माजी अध्यक्ष कैलास म्हापदी, ज्येष्ठ छायाचित्रकार किस्तु फर्नांडिस,अनिल शुक्ला, गणेश भोईटे, उपस्थित होते.महसूल विभागाची मीटिंग सुरू झाल्यामुळे चार तास थांबल्यानंतर मिळालेला निर्णय हा पत्रकार संघाच्या एकजुटीचा विजय आहे. तत्पूर्वी सदरची बाब जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्याही निदर्शनास आणून देण्यात आली होती!
