महाप्रसादासाठी एफडीएचे कडक नियम: तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय, उल्लंघन केल्यास थेट गुन्हे दाखल!
अन्न सुरक्षा ताज्या बातम्या

महाप्रसादासाठी एफडीएचे कडक नियम: तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय, उल्लंघन केल्यास थेट गुन्हे दाखल!

Aug 23, 2026

FDA २३ – अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील महाप्रसादाच्या आयोजनाबाबत कडक आणि नवे मार्गदर्शक नियम जारी केले आहेत. विषबाधेसारख्या घटना टाळण्यासाठी तसेच अन्नाचा दर्जा व स्वच्छता राखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.या नव्या नियमांनुसार, महाप्रसादाचे वाटप करणाऱ्या आयोजकांना एफडीएची अधिकृत नोंदणी किंवा परवाना घेणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. आयोजकांच्या सोयीसाठी नोंदणी प्रक्रिया अत्यंत सोपी केली असून, केवळ १०० रुपयांत ऑनलाईन परवाना प्राप्त करता येईल. जर कोणी विनापरवाना महाप्रसाद आयोजित केला, तर संबंधित आयोजकांवर थेट गुन्हे दाखल केले जातील.

महाप्रसाद तयार करताना आणि वाटताना स्वच्छतेला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे. स्वयंपाक बनवण्यासाठी व पिण्यासाठी केवळ आरओ पाण्याचाच वापर करावा लागेल. अन्न शिजवणाऱ्या आणि वाढणाऱ्या स्वयंसेवकांना डोक्यावर टोपी, मास्क आणि हातमोजे वापरणे अनिवार्य आहे.याशिवाय, अन्न साठवणूक आणि वाटपासाठी केवळ स्टेनलेस स्टील किंवा अन्नसुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षित असलेल्या भांड्यांचाच वापर करावा लागेल. भावीकांना शिळे अन्न वाटप केल्यास आयोजकांवर कठोर कारवाई केली जाईल. यापूर्वी सुट्टे तेल न वापरण्याचे आवाहन करणाऱ्या एफडीएने आता महाप्रसादासाठी हे कडक नियम लागू केले आहेत!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *