मुंबई-गोवा महामार्ग अद्याप अपूर्ण; गणेशोत्सवात चाकरमान्यांचे हाल कायम?
महाराष्ट्र वाहतूक

मुंबई-गोवा महामार्ग अद्याप अपूर्ण; गणेशोत्सवात चाकरमान्यांचे हाल कायम?

Jul 30, 2026

मुंबई ३० :गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या अडचणी यंदाही कमी होण्याची चिन्हे नाहीत. गेली १८ वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम अजूनही अपूर्णच असून, ऐन सणासुदीच्या काळात प्रवाशांना दुरवस्थेचा सामना करावा लागणार आहे.

मुदती संपल्या पण काम अपूर्णच प्रशासनाकडून दरवर्षी महामार्ग पूर्ण करण्यासाठी विविध डेडलाईन जाहीर केल्या जातात. मात्र, एकही मुदत पाळली गेलेली नाही. यंदाच्या पावसाळ्यात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांतील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले असून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

चाकरमान्यांचा प्रश्न महामार्ग पूर्ण कधी होणार?

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. मात्र रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे यंदाचा प्रवास अत्यंत कठीण ठरणार आहे. एवढी वर्षे उलटूनही हा मार्ग पूर्ण क्षमतेने कधी सुरू होणार, असा संतप्त सवाल आता कोकणवासीय विचारत आहेत!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *