Ganpati festival : गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी; वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय!
ठाणे,दि.८ :- आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, तसेच महामार्गावरील संभाव्य वाहतूक कोंडी टाळता यावी, यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर गणेशोत्सवादरम्यान १६ टन किंवा त्यापेक्षा अधिक वजनक्षमता (Gross Weight) असलेल्या
Ganpati festival : गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी…मुंबईत बेस्ट बस आणि मेट्रोने रात्री उशिरापर्यंत करता येणार प्रवास, वेळापत्रक पाहा!
गणेशोत्सवाच्या काळात गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी बेस्ट उपक्रमाच्या वाहतूक विभागाने विशेष नियोजन केले आहे. गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील प्रमुख गणेश मंडळे आणि गर्दीच्या ठिकाणी जाणाऱ्या भाविकांसाठी बेस्टच्या जादा बसगाड्या रात्रभर धावणार आहेत.लालबाग, परळ, गिरगाव, खेतवाडी यांसह दक्षिण मुंबईतील प्रमुख विभागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात
Eknath shinde: गणेशभक्तांच्या गावाकडच्या प्रवासासाठी २९०० एसटी गाड्या सज्ज; ‘सण-उत्सव हीच आपली संस्कृती, परंपरा पुढे नेऊया’- एकनाथ शिंदे…गणेशभक्तांसाठी मोफत बससेवेचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ!
ठाणे, ता. ०७ : गणेशोत्सवासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा, यासाठी शिवसेनेच्या वतीने मोफत बससेवेचा उपक्रम राबविण्यात आला असून, तब्बल २९०० एसटी बसची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. गणेशभक्तांसाठी मोफत
Thane: ठाणे महापालिकेतर्फे सार्वजनिक गणेशोत्सव आरास स्पर्धेचे आयोजन!
ठाणे : दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे महानगरपालिकेतर्फे ठाणे महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी अनंतचतुर्दशीपर्यंतच्या कालावधीत सार्वजनिक गणेशोत्सव आरास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या गणेश मंडळांसाठी अर्ज माहिती व जनसंपर्क विभाग, महापालिका भवन, पहिला मजला, पाचपाखाडी, ठाणे येथे उपलब्ध करून
Thane: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी समन्वय साधून काम करावे – महापौर शर्मिला पिंपळोलकर!
ठाणे ०१ : १४ सप्टेंबर रोजी सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी आज तातडीची बैठक घेतली. या बैठकीत गणेश मंडळांच्या प्रलंबित परवानग्या, गणेशमूर्तीच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची दुरूस्ती, स्वच्छता, विसर्जन घाटांची सुरक्षितता, स्वच्छता, मनुष्यबळ, वाहतूक व्यवस्था तसेच शाडू मातीच्या मूर्तींसाठी स्वतंत्र विसर्जन
Ganpati festival : गणेशोत्सवासाठी रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकाला परवानगी; जाणून घ्या ४ प्रमुख दिवस आणि नियम!
मुंबईतील गणेशोत्सव मंडळांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. यंदाच्या गणेशोत्सवामध्ये एकूण चार दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक (लाऊडस्पीकर) वापरण्यास विशेष परवानगी देण्यात आली आहे. ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, २००० नुसार सामान्यतः रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत
Mumbra: मुंब्र्यातील तरूणांनी कृतीतून दिला हिंदू -मुस्लीम एकतेचा संदेश; गणरायाच्या मूर्तीला इजा पोहचू नये म्हणून चार तास परिश्रम!
ठाणे – हिंदू, मुस्लीम अशी संमिश्र वस्ती असलेल्या मुंब्र्याने नेहमीच सामाजिक एकतेचा संदेश दिला आहे. आज पहाटे याच पद्धतीने सामाजिक सौहार्दाचे दर्शन घडवून मुंब्रा येथील तरूणांनी एक आदर्श निर्माण केला आहे. गणरायाच्या मूर्तीला घेऊन गणेशोत्सव मंडपाच्या दिशेने निघालेली ट्राॅली तुटल्यानंतर या तरूणांनी क्रेन
Ganpati agman sohla: परळ-चिंचपोकळी भागात मिरवणुकीदरम्यान दोन गटात वाद: दगडफेकीनंतर पोलिसांचा हस्तक्षेप, परिस्थिती नियंत्रणात!
मुंबई २७ : मुंबईतील परळ-चिंचपोकळी परिसरात एका मिरवणुकीदरम्यान दोन गटांमध्ये वाद होऊन बाचाबाची व धक्काबुक्की झाल्याची घटना घडली. घोषणाबाजी आणि पोस्टर्स फाडल्याच्या प्रकारानंतर परिसरात तणाव वाढला, तसंच काही ठिकाणी दगडफेक झाल्याचीही माहिती समोर आली आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी
Mumbai Ganpati festival: भुलेश्वर दुर्घटनेनंतर बीएमसीचा मोठा निर्णय; १ टनापेक्षा जास्त वजन असलेल्या गणेशमूर्तींसाठी ‘फिटनेस सर्टिफिकेट’ अनिवार्य!
मुंबईतील भुलेश्वरमध्ये गणेश मूर्तीच्या आगमनादरम्यान झालेल्या अपघातानंतर बीएमसी प्रशासनाने मोठा निर्णय घेतलाय. २२ ऑगस्ट रोजी मुंबईतील भुलेश्वर राजा गणेश मंडळाच्या आगमन मिरवणुकीत २२ फुटाची गणेश मूर्ती कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गणेशमूर्तीच्या उंचीबद्दल पुन्हा एकदा सवाल उपस्थित केले जात आहेत.गणेशोत्सवादरम्यान मूर्तींचे
Mazgaon: माझगावमध्ये गणपती आगमनावर अंडी फेकल्याचा आरोप, दोन गटात तणाव; एफआयआर दाखल, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात!
माझगाव २४ : मुंबईतील माझगाव परिसरात गणेशमूर्ती आगमन मिरवणुकीवर अंडी फेकल्याच्या आरोपानंतर तणाव निर्माण झाला. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे, तसेच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या उत्साहात मुंबईतील माझगाव परिसरात रविवारी रात्री एक निंदनीय घटना समोर
