मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी राज्य सरकारचे मोठे पाऊल, घाटकोपरमध्ये ‘१००० मुली, १००० स्वप्ने’ उपक्रमाचा शुभारंभ!
मुंबई शिक्षण

मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी राज्य सरकारचे मोठे पाऊल, घाटकोपरमध्ये ‘१००० मुली, १००० स्वप्ने’ उपक्रमाचा शुभारंभ!

Jul 31, 2026

मुंबई ३१: गरजू आणि वंचित कुटुंबातील मुलींच्या शिक्षण व आर्थिक सुरक्षेला बळ देण्यासाठी राज्य सरकारने ‘एम्पॉवरिंग हर फ्युचर: १००० बेटियाँ, १००० सपने, एक विश्वास’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची घोषणा केली आहे. घाटकोपर पश्चिम येथील एसपीआरजे कन्याशाळा ट्रस्ट स्कूलमध्ये या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमांतर्गत १,००० गरजू मुलींना थेट सरकारी योजनांशी जोडून त्यांच्या बचत खात्यांचे वाटप केले जाईल. यामध्ये १० वर्षांखालील मुलींसाठी ‘सुकन्या समृद्धी योजना’ आणि १० वर्षांवरील मुलींसाठी ‘एनपीएस वात्सल्य योजना’ या दोन प्रमुख योजनांचा समावेश आहे. लहानपणापासूनच मुलींमध्ये आर्थिक साक्षरता वाढवणे आणि त्यांच्या भविष्यासाठी दीर्घकालीन बचत निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच भाजप आमदार प्रसाद लाड यांचीही याप्रसंगी प्रमुख उपस्थिती असेल. गौरव भंडारी यांच्या नेतृत्वाखाली या सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेकडो गरजू कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *