Mumbai: मुंबई हादरली.. बायको अन् २ मुलांची हत्या, नंतर नौदल कर्मचाऱ्याने संपवलं आयुष्य!
न्यूज मुंबई

Mumbai: मुंबई हादरली.. बायको अन् २ मुलांची हत्या, नंतर नौदल कर्मचाऱ्याने संपवलं आयुष्य!

Aug 16, 2026

मुंबई मुंबईमध्ये नौदल कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने बायको आणि दोन मुलांची हत्या केली. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील नेव्ही नगर परिसरात एका घरातून एका चौघांचे मृतदेह आढळून आले. नौदल कर्मचाऱ्याने आपली बायको आणि दोन मुलांची हत्या केली. त्याने या तिघांना विष दिलं. त्यानंतर स्वतः देखील गळफास घेत आत्महत्या केली. या नौदल कर्मचाऱ्याच्या मुलांचे वय अंदाजे ३ वर्षे आणि २ महिने असल्याचे सांगितले जात आहे.पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत चौघांचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.

पोलीस सध्या या चौघांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी सर्व बाबींची तपासणी करत आहेत. घटनास्थळी सध्या नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, नौदल कर्मचाऱ्याने गळफास घेतल्याने त्याचा मृत्यू झाला. तर त्याची बायको आणि दोन मुलांचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचा संशय आहे. पोलिसांनी सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयात पाठवले आहेत. शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे नेमके कारण कोणते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.नौदल अधिकारी पोलिसांच्या साथीने या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेमागील हेतू आणि कुटुंबाने हे टोकाचे पाऊल का उचलले हे शोधण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *