Khvdya donger: आयफोन नव्हे, तर तुटलेले कुटुंब ठरले कारण…छत्रपती संभाजीनगरमधील घटनेत नवा अँगल!
छत्रपती संभाजीनगर येथील खवड्या डोंगरावर घडलेल्या कुणाल चांदगुडे आणि त्याच्या आई-वडिलांच्या आत्महत्येच्या घटनेत एक नवा आणि धक्कादायक ट्विस्ट समोर आला आहे. सुरुवातीला कुणालने आयफोनच्या हट्टापायी हे अत्यंत टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा होती, मात्र त्याच्या मावशी कल्याणी परडे यांनी या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा खुलासा केला आहे.कल्याणी परडे यांच्या मते, कुणालला मुळात आत्महत्या करायचीच नव्हती. तो फक्त त्याच्या आई-वडिलांना भावनिक करून एकत्र आणण्यासाठी आणि आपल्या वडिलांना परत मिळवण्यासाठी खवड्या डोंगरावर गेला होता.
चार-पाच दिवसांपूर्वीच कुणालचे त्याच्या वडिलांसोबत फोनवरून बोलणे झाले होते, ज्यामध्ये त्याने ‘तुम्ही मला सोडून कसे जाऊ शकता, मला तुम्ही पाहिजे’ असे सांगत आपली खंत व्यक्त केली होती.कुणालच्या मावशीने स्पष्ट केले की, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची नव्हती; त्यांच्याकडे शेती होती आणि चांगल्या घरातून ते आले होते. आयफोनचा मुद्दा हा आत्महत्येचे मुख्य कारण नसून, त्याला अभ्यासासाठी आणि क्लासेससाठी मोबाईल हवा होता आणि तो त्यांना सहज परवडणारा होता. दुर्दैवाने, घरातील विसंवाद आणि भावनिक तणावामुळे ही दुर्घटना घडली. वडिलांना आपल्याकडे परत आणण्याचा कुणालचा हा प्रयत्न दुर्दैवाने या मोठ्या दुर्घटनेत बदलला, ज्यामुळे या प्रकरणाला आता एक नवीन दिशा मिळाली आहे!
