Amit thackrey: छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोच्या अगदी शेजारी पंतप्रधान मोदींचा फोटो.. अमित ठाकरेंच्या सूचनेनंतर फोटो काढला, पुण्यात राजकीय चर्चांना उधाण!
ताज्या बातम्या पुणे

Amit thackrey: छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोच्या अगदी शेजारी पंतप्रधान मोदींचा फोटो.. अमित ठाकरेंच्या सूचनेनंतर फोटो काढला, पुण्यात राजकीय चर्चांना उधाण!

Aug 31, 2026

मनसे नेते अमित ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर असून, यादरम्यान ते विविध महाविद्यालयांना भेटी देऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी, महाविद्यालयातील समस्या आणि सोयी-सुविधांबाबत ते माहिती घेत आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी शिवाजीनगर येथील शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालयाला भेट दिली.

प्राचार्यांच्या कार्यालयात संवाद साधत असताना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोच्या अगदी शेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावलेला अमित ठाकरे यांच्या निदर्शनास आला. हे पाहताच अमित ठाकरे भडकले आणि त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

“महाराजांच्या शेजारी मोदींचा फोटो कशासाठी?” असा थेट सवाल उपस्थित करत त्यांनी कार्यकर्त्यांना तो फोटो तिथून तातडीने काढण्यास सांगितला. अमित ठाकरेंच्या या भूमिकेनंतर कार्यकर्त्यांनी तो फोटो तिथून हटवला. या घटनेनंतर महाविद्यालयात एकच खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळातही अमित ठाकरेंच्या या भूमिकेची जोरदार चर्चा सुरू आहे!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *