जव्हार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या चेअरमनपदी युवा नेतृत्वाचा उदय श्री. धीरज निलेश सांबरे यांचे जव्हारसह झडपोलीत जल्लोषात स्वागत!
जव्हार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या चेअरमनपदी श्री. धीरज निलेश सांबरे यांची निवड झाल्याने जव्हारच्या सहकार क्षेत्रात युवा नेतृत्वाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. बँकेच्या इतिहासातील सर्वात तरुण चेअरमन म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली असून, त्यांच्या निवडीचे जव्हारसह झडपोली परिसरात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.तरुण नेतृत्वाला संधी
खड्डेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्व महानगरपालिकांना कामाला लागण्याचे निर्देश;पावसाळ्यात तातडीने दिलासा देण्यासाठी खड्डे बुजवायला प्री कास्ट आणि जियो पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर करा…शहरातील सर्व प्रमुख रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी पालिका स्तरावर कालबद्ध कार्यक्रम तयार करा;खड्डेमुक्त गणेशोत्सव साजरा करून दाखवणाऱ्या महानगरपालिकेला मिळणार विशेष बक्षीस..गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला राज्यातील मनपा तयारीचा आढावा!
ठाणे दि १७ ऑगस्ट :- खड्डेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी राज्यातील सर्व महानगरपालिकांनी तत्काळ कामाला लागावे. पावसाळ्यात तातडीने रस्ते बुजविण्यासाठी प्री कास्ट आणि जिओ पॉलिमर टेक्नो पॅच यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, तसेच शहरातील अंतर्गत रस्ते विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवावा
Thane: बदलत असलेल्या ठाणे शहराचा विकास छायाचित्रातून मांडावा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे..जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ठाण्यात छायाचित्र प्रदर्शन; शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार!
ठाणे १७ : छायाचित्र हे केवळ एखाद्या क्षणाचे चित्रण नसून त्या एका छायाचित्रातून हजारो शब्द व्यक्त होत असतात. एखादे चित्र पाहिल्यानंतर त्या घटनेची किंवा प्रसंगाची अनुभूती नागरिकांना येते. तसेच छायाचित्रांच्या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा देखील दिला जातो. ठाणं बदलतंय.. ठाण्याचा होत असलेला विकास
Thane: ठाणे शहराच्या ३०२.३८ कोटींच्या मलनिस्सारण प्रकल्पाला मंजुरी; १२ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे नियोजन!
ठाणे १७ : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मलनिस्सारण व्यवस्था बळकट करण्यासाठी ३०२.३८ कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला केंद्र शासनाच्या शिखर समितीसह राज्य शासनाने मंजुरी दिली. शहरातील मलवाहिन्यांमधील त्रुटी दूर करण्यापासून नव्या विकसित भागांत मलवाहिन्यांचे जाळे उभारण्यापर्यंत विविध कामे या प्रकल्पातून केली जातील.पहिल्या टप्प्यात कोपरी, नौपाडा,
Sanjay kelkar: थकबाकीदार बिल्डर मोकाट…सर्वसामान्यांवर वाढीव कराचा बोजा; अकार्यक्षम अधिकाऱ्यांवर कारवाई करा-आ. संजय केळकर!
ठाणे १७ : शहरातील मोबाईल टॉवर कंपन्या आणि बड्या विकासकांकडून मालमत्ता कराची कोट्यवधींची थकबाकी वसूल करण्यात प्रशासन अपयशी ठरत असताना दुसरीकडे सर्वसामान्य ठाणेकरांवर १२ टक्के करवाढ केली जाते. त्यामुळे आधी थकबाकी वसुली करा आणि अकार्यक्षम अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी आमदार संजय
Thane: शाळेच्या बाकावर ड्रग्ज; ठाण्यात ‘उडता पंजाब’ची भीती?
ठाणे १७ : ठाण्यातील एका कनिष्ठ महाविद्यालयातील १६ वर्षीय विद्यार्थ्याचा अमली पदार्थांचे सेवन करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक विद्यार्थी हातात पांढरा पदार्थ घेऊन बसला असून दुसरा मुलगा नाकाने त्याचे सेवन करताना दिसत आहे. या धक्कादायक प्रकारामुळे शाळेच्या बाकावरच ड्रग्ज पोहोचल्याचे
Ganpati festival:गणेशोत्सवाच्या आगमन मिरवणुकांचा उत्साह; परळ, लालबाग परिसरातील वाहतुकीत बदल!
मुंबई १७ : मुंबईत ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत सार्वजनिक गणेशोत्सवाची जोरदार लगबग सुरू झाली आहे. परळ, लालबाग आणि करी रोड येथील कारखान्यांमधून गणरायाच्या भव्य मूर्ती मोठ्या वाहनांमधून मंडपांकडे रवाना होत आहेत. या आगमन मिरवणुकांमध्ये तरुण-तरुणी विविध वेषभूषा करून मोठा उत्साह दाखवत आहेत,
Tukaram Munde: एफडीएचा बॉलीवूड कलाकारांना दणका: ‘विमल इलायची’ जाहिरातीप्रकरणी कारणे दाखवा नोटीस!
तुकाराम मुंढे १७ : तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (FDA) बॉलीवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांना ‘विमल इलायची’च्या जाहिरातीबाबत ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावली आहे. या जाहिरातीद्वारे राज्यात बंदी असलेल्या ‘विमल पान मसाला’ या तंबाखूजन्य
Thane: तंबाखूविरोधी जनजागृती सत्रातून विद्यार्थ्यांना ‘तंबाखूला नकार’ देण्याचे आवाहन!
ठाणे १७ : शासनाच्या जनजागृती उपक्रमांतर्गत इयत्ता ११ वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी तंबाखूविरोधी जनजागृती सत्राचे आयोजन न्यू कळवा हायस्कूल येथील कनिष्ठ महाविद्यालयात नुकतेच (14 ऑगस्ट) करण्यात आले. तंबाखूच्या सेवनामुळे होणारे गंभीर दुष्परिणाम, व्यसनाधीनतेचे धोके तसेच तंबाखूपासून दूर राहण्याचे महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर
Thane : ठामपा शाळांतील विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे उद्घाटन!
ठाणे १७ : ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे महानगरपालिका शाळांमधील आरोग्य तपासणी शिबिरांतर्गत हिमोग्लोबिनोपॅथी चाचणीचा शुभारंभ 15 ऑगस्ट 2026 रोजी ठाणे मनपा शाळा क्र. 69, कळवा येथे करण्यात आला. हिमोग्लोबिनोपॅथी
