Auto – taxi driver : रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकणे अनिवार्यच..हायकोर्टाने फेटाळली विरोधातील याचिका!
ताज्या बातम्या

Auto – taxi driver : रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकणे अनिवार्यच..हायकोर्टाने फेटाळली विरोधातील याचिका!

Aug 30, 2026

रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेच्या अनिवार्य नियमाची अंमलबजावणी रोखण्यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावत परप्रांतीय चालकांना मोठा झटका दिला आहे. या सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांच्या वतीने चालकांना मराठी भाषा शिकण्याची सक्ती करू नये असा युक्तिवाद करण्यात आला होता. मात्र, ‘मराठी एकीकरण समिती’च्या वतीने नाईक अँड नाईक अँड कंपनीच्या अधिवक्ता समूहातील अधिवक्ता मधू गडोदिया यांनी न्यायालयात भक्कम बाजू मांडली.

त्यांनी महाराष्ट्रातील मराठी भाषेचे कायदेशीर स्थान, ‘महाराष्ट्र अधिकृत भाषा अधिनियम १९६४’ आणि स्थानिक नागरिकांच्या भाषिक हक्कांकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. तसेच, चालकांना मराठी शिकण्यासाठी याआधीच पुरेसा वेळ देण्यात आला असून शासनाने आणखी एका वर्षाची मुदतवाढ दिल्याची माहितीही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर विरोध करणारी याचिका फेटाळली.

दरम्यान, शासनाने दिलेली ही एक वर्षाची मुदतवाढ समितीला मान्य नसून, त्याविरोधात येत्या आठवड्यात न्यायालयात योग्य कायदेशीर युक्तिवाद केला जाईल, असे समितीने स्पष्ट केले आहे. या सुनावणीच्या वेळी मराठी एकीकरण समितीचे सचिव कृष्णा जाधव, उपाध्यक्ष प्रमोद सुधाकर पार्टे, समन्वयक सुरज चव्हाण यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *