BMC Job : मुंबई महापालिकेत 473 वाहनचालकांची भरती अंतिम टप्प्यात; तरुणांसाठी मोठी संधी!
ताज्या बातम्या न्यूज मुंबई

BMC Job : मुंबई महापालिकेत 473 वाहनचालकांची भरती अंतिम टप्प्यात; तरुणांसाठी मोठी संधी!

Aug 3, 2026

BMC Job ०३ : मुंबई महापालिकेत नोकरीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महापालिकेच्या परिवहन आणि घनकचरा व्यवस्थापन विभागातील तब्बल 473 वाहनचालकांची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून, लवकरच या पदांसाठी भरतीला वेग मिळण्याची शक्यता आहे.गेल्या दोन वर्षांपासून रिक्त वाहनचालक पदे भरण्याची मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेकडून सातत्याने करण्यात येत होती. अनेक पदे रिक्त असल्यामुळे कार्यरत चालकांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला होता.

त्यामुळे त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होत असल्याची बाब संघटनेने महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. या पार्श्वभूमीवर घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख अभियंता विनायक भट यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत भरती प्रक्रियेला गती देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे 473 वाहनचालकांची पदे लवकरच भरली जाण्याची शक्यता आहे.ठाणे महापालिकेतही 61 पदांसाठी भरतीदरम्यान, ठाणे महापालिकेतही विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.

एकूण 61 रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. या भरतीमध्ये स्टाफ नर्स (महिला) – 28 पदे, स्टाफ नर्स (पुरुष) – 3 पदे आणि बहुउद्देशीय कर्मचारी – 30 पदे भरली जाणार आहेत.स्टाफ नर्स पदासाठी उमेदवारांनी बी.एस्सी. नर्सिंग किंवा जीएनएम अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक आहे. बहुउद्देशीय कर्मचारी पदासाठी बारावी (विज्ञान शाखा) उत्तीर्ण असण्याबरोबरच पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स पूर्ण केलेला असणे गरजेचे आहे.या भरतीसाठी सामान्य प्रवर्गातील उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे ठेवण्यात आली आहे. तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार 3 ते 5 वर्षांची वयोमर्यादेत सवलत देण्यात येणार आहे.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *