CJP : कॉकरोच जनता पार्टी कडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर!
छत्रपती संभाजीनगर: ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) कडून पक्षाची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी आणि विभागीय प्रभारींची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी आणि आगामी उपक्रमांसाठी ही महत्त्वाची पदे निश्चित करण्यात आली आहेत.
पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी (National Executive Council)
संस्थापक आणि राष्ट्रीय संयोजक: अभिजीत दीपके
सहसंयोजक: आशुतोष रांका आणि सौरव दास
राष्ट्रीय संघटन प्रभारी: अजिंक्य शिंदे
संघटन सहप्रभारी: दीपक बालियान
राष्ट्रीय सचिव: आफरीन नवाज
मीडिया प्रमुख: विजय रेड्डी मल्लांगी (वय ३० वर्ष)
कायदेशीर प्रकरणे प्रमुख: रत्ना सिंह
रिसर्च अँड पॉलिसी प्रमुख: वैष्णवी गौड
तंत्रज्ञान प्रमुख: रोहन देशपांडे
वित्त प्रमुख: योगेश इंगळे
विभागनिहाय प्रभारी (Regional In-Charges)
उत्तर विभाग: दीपक बालियान
दक्षिण विभाग: विजय रेड्डी मल्लांगी
पूर्व आणि ईशान्य विभाग: अंकित भारद्वाज (वय ३५ वर्ष)
पश्चिम विभाग: योगेश इंगळे
प्रमुख वैशिष्ट्ये व पुढील दिशा:
या कार्यकारिणीच्या घोषणेनंतर पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी एका मोठ्या मोहिमेची घोषणा केली आहे. भारतातील सर्व प्रमुख पक्ष आणि संघटनांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणण्यासाठी CJP कडून विशेष पुढाकार घेतला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे!
