LPG ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना.. १५ ऑगस्टपूर्वी e-KYC पूर्ण करा, अन्यथा गॅस सिलिंडर मिळण्यात येऊ शकते अडचण!
ताज्या बातम्या

LPG ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना.. १५ ऑगस्टपूर्वी e-KYC पूर्ण करा, अन्यथा गॅस सिलिंडर मिळण्यात येऊ शकते अडचण!

Aug 3, 2026

LPG Gas cylinder: देशभरातील घरगुती LPG गॅस ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. सर्व ग्राहकांनी १५ ऑगस्टपूर्वी e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन गॅस कंपन्यांकडून करण्यात आले आहे. निर्धारित मुदतीत e-KYC न केल्यास गॅस रिफिल बुकिंगमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. तसेच काही प्रकरणांमध्ये घरगुती सिलिंडरऐवजी व्यावसायिक दर लागू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

गॅस कंपन्यांच्या माहितीनुसार, e-KYC मोहिमेचा उद्देश प्रत्येक गॅस कनेक्शनची पडताळणी करणे, बनावट किंवा अनधिकृत कनेक्शन रोखणे आणि शासकीय अनुदान पात्र लाभार्थ्यांपर्यंतच पोहोचवणे हा आहे. त्यामुळे सर्व वितरकांना जास्तीत जास्त ग्राहकांची e-KYC पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अनेक ग्राहकांनी अद्याप e-KYC केलेली नसल्याने गॅस एजन्सीकडून फोन, एसएमएस तसेच प्रत्यक्ष संपर्क साधून प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले जात आहे. काही ठिकाणी e-KYC न झाल्यास रिफिल बुकिंग तात्पुरते रोखले जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

e-KYC कशी कराल?

ग्राहक आपल्या जवळच्या गॅस एजन्सीला भेट देऊन किंवा संबंधित गॅस कंपनीच्या अधिकृत ऑनलाइन सुविधेद्वारे e-KYC पूर्ण करू शकतात. यासाठी आधार कार्ड, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि आवश्यक ओळखपत्रांची आवश्यकता असते. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ग्राहकाच्या गॅस कनेक्शनची माहिती अद्ययावत केली जाते. त्यामुळे कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी सर्व LPG ग्राहकांनी १५ ऑगस्टपूर्वी e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *