Maharashtra Talathi Bharti 2026: तलाठी भरतीसाठी अर्ज करण्यास उरले अवघे काही तास…आजच करा अर्ज;’या’ वेळेनंतर लिंक होणार बंद!
Maharashtra Talathi Bharti 2026 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ द्वारे ‘ग्राम महसूल अधिकारी’ (तलाठी) आणि इतर विविध ५,७०७ पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी आज (५ ऑगस्ट २०२६) रात्री ११:५९ वाजेपर्यंतच मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे अद्याप अर्ज न भरलेल्या इच्छुकांनी शेवटच्या क्षणाची घाई टाळून त्वरित अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
महत्त्वाचे तपशील व अपडेट्स:
एकूण पदे: या भरती प्रक्रियेतून तलाठी (१,५३९ पदे), लिपिक-टंकलेखक आणि इतर विविध संवर्गातील मिळून एकूण ५,७०७ पदे भरली जाणार आहेत.
शैक्षणिक अर्हता: तलाठी पदासाठी उमेदवाराकडे सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
परीक्षेची तारीख: ही संयुक्त पूर्व परीक्षा २५ ऑक्टोबर २०२६ रोजी ऑफलाइन (OMR आधारित) पद्धतीने घेतली जाईल.परीक्षा शुल्क भरण्याची मुदत: ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्यासाठी ०८ ऑगस्ट २०२६ रात्री ११:५९ वाजेपर्यंत मुदत असेल. (टीप: चलनाद्वारे शुल्क भरण्याची सवलत बंद करण्यात आली आहे.)उमेदवारांनी ‘या’ गोष्टीची नोंद घ्यावी:जाहिरातीमध्ये पद आरक्षित नसल्यामुळे, पदसंख्या कमी असल्यामुळे अथवा संवर्गाचा समावेश नसल्यामुळे पूर्व परीक्षेसाठी अर्ज सादर केला नाही, अशी कोणतीही तक्रार नंतर विचारात घेतली जाणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पात्रताधारक सर्व उमेदवारांनी वेळ न दवडता mpsc.gov.in किंवा mpsconline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला अर्ज तात्काळ सबमिट करावा.How to apply for Talathi Bharti 2026:महाराष्ट्र तलाठी भरती २०२६ साठी अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:१. सुरुवातीला एमपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळाला (mpsconline.gov.in/candidate/login)भेट द्या.
२. तिथे उमेदवाराने स्वतःचे खाते (प्रॉफाईल) तयार करावे किंवा लॉगिन करावे.
३. त्यानंतर नवीन भरती प्रक्रियेतील पर्यायावर जाऊन ‘गट-क’ च्या जाहिरातीवर क्लिक करा.
४. तिथे उमेदवार पात्र असलेल्या सर्व पदांची यादी दिसेल.
५. तुम्ही ज्या पदांसाठी पात्र आहात, त्या सर्व पर्यायांसमोरील चौकटीत (चेक बॉक्स) क्लिक करा.
६. त्यानंतर आवश्यक ती सर्व माहिती भरून परीक्षेसाठी केंद्र निवडा.
७. शेवटी अर्जाचे शुल्क (फी) भरून अर्ज सादर (सबमिट) करा.
८. अर्ज यशस्वीरीत्या सादर झाल्यानंतर त्याची मुद्रित प्रत (प्रिंटआऊट) काढून स्वतःकडे सुरक्षित ठेवा.
